agriculture news in marathi, weather, central Maharashtra to have scattered rainfall tommorow | Agrowon

मध्य महाराष्ट्रात उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 मार्च 2018

पुणे : मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकचा दक्षिण भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज या क्षेत्राची तीव्रता अधिक होण्याची शक्यता आहे. उद्या (शनिवार) मध्य महाराष्ट्रात, रविवारी (ता. २५) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून (ता. २६) राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकचा दक्षिण भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज या क्षेत्राची तीव्रता अधिक होण्याची शक्यता आहे. उद्या (शनिवार) मध्य महाराष्ट्रात, रविवारी (ता. २५) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून (ता. २६) राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

बिहार ते तमिळनाडू या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र पश्चिमेकडे हळूहळू सरकत असून, ते उत्तर प्रदेशचा आग्नेय भाग, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, विदर्भ, तेलंगण आणि रायलसीमाच्या भागात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील कमाल तापमानात अंशतः बदल होण्याची शक्यता आहे. तसेच, छत्तीसगडच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असून, कमाल तापमानात अंशतः चढ-उतार होत आहे.

मराठवाडा व विदर्भात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे. गुरुवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ३९.७ अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथील कमाल तापमान ३९.० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. पुढील दोन दिवस मराठवाडा व विदर्भात कोरडे हवामान राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.  

विदर्भानंतर कोकणातील भिरा येथे ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू येथील कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान ३८.० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. नगरमध्ये ३८.२ अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही उन्हाचा चांगलाच पारा वाढला आहे. परभणी येथे ३८.० अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले.   

गुरुवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंद झालेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई ३१.६, सांताक्रूझ ३२.०, अलिबाग ३०.७, रत्नागिरी ३३.७, डहाणू ३२.३, भिरा ३९.५, पुणे ३५.२, नगर ३८.२, जळगाव ३७.०, कोल्हापूर ३५.४, महाबळेश्वर ३०.७, मालेगाव ३७.२, नाशिक ३३.८, सांगली ३६.४, सातारा ३५.३, सोलापूर ३८.१, उस्मानाबाद ३६.२, औरंगाबाद ३५.७, परभणी ३८.०, नांदेड ३८.५, अकोला ३८.४, अमरावती ३७.८, बुलडाणा ३५.५, ब्रह्मपुरी ३९.७, चंद्रपूर ३९.४, गोंदिया ३७.०, नागपूर ३९.१, वाशीम ३८.०, वर्धा ३९.५, यवतमाळ ३८.०

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...