त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
अॅग्रो विशेष
पुणे : अरबी समुद्राजवळ दाखल झालेल्या ओखी चक्रीवादळाची तीव्रता काहीशी कमी झाली असून, हे चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजरामधील सुरतसह अनेक शहराला फटका बसण्याचा अंदाज आहे. आज (मंगळवारी) कोकणच्या उत्तर भागातील अनेक ठिकाणी, दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागातील काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (बुधवारी) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या (सोमवारी) हे चक्रीवादळ अमिनीदेवीपासून वायव्येकडे सहाशे किलोमीटर अंतरावर होते. मुंबईपासून वायव्येकडे 670 किलोमीटर, सुरतपासून वायव्येकडे 850 किलोमीटर अंतरावर होते. हे चक्रीवादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडे सरकत असून, त्याचे रूंपातर अतिकमी दाबाच्या क्षेत्रात होऊन ते दक्षिण गुजरात आणि लगतच्या उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आज (ता.5) मध्य रात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम बुधवार (ता. 6) पर्यंत जाणवणार असून, त्यानंतर ते विरत जाणार आहे. या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप, केरळ, गोवा, कर्नाटकाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत असून, मच्छीमारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
या चक्रीवादळाबरोबर सुमात्रा बेट आणि दक्षिण अंदमान समुद्राजवळ आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागला असून, तो येत्या दोन दिवसांत तो सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्रप्रदेश किनारपट्टीच्या दिशेने येण्याची शक्यता आहे.
सध्या या चक्रीवादळाच्या वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर एवढा आहे. गोवा, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीलगत ताशी 25 ते 45 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला असून मच्छीमारांनी मासेमारीसाठी तीन ते चार दिवस समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. सोमवारी (ता.4) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे 9.4 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
सोमवारी (ता.4) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई (सांताक्रुझ) 23.0, अलिबाग 23.6, रत्नागिरी 24.3 (3), डहाणू 21.6 (2), भिरा 23.5 (4), नगर 13.6, पुणे 17.5 (5), जळगाव 13.6, कोल्हापूर 20.0 (3), महाबळेश्वर 15.7 (1), मालेगाव 16.4, नाशिक 16.1 (4), सांगली 16.2, सातारा 19.1 (4), सोलापूर 16.4 (-1), औरंगाबाद 15.2 (3), परभणी 10.6 (-4), नांदेड 15.5 (1), अकोला 14.5, अमरावती 14.8 (-3), बुलडाणा 15.8 (2), चंद्रपूर 14.6, गोंदिया 9.4, नागपूर 10.3 (-2), वर्धा 11.7 (-3), यवतमाळ 13.4 (-1)
- 1 of 287
- ››