agriculture news in marathi, weather, climate, temperature | Agrowon

राजस्थानच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

पुणे : कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत नाही, तेच राजस्थानच्या वायव्येच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती 11 ते 12 डिसेंबर या दरम्यान अधिक सक्रिय होणार आहे. यामुळे जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड पंजाब, हरियाना आणि चंडिगड या भागात जोरदार पाऊस पडेल. त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसला, तरी वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होत नाही, तेच राजस्थानच्या वायव्येच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती 11 ते 12 डिसेंबर या दरम्यान अधिक सक्रिय होणार आहे. यामुळे जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड पंजाब, हरियाना आणि चंडिगड या भागात जोरदार पाऊस पडेल. त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसला, तरी वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होऊन हळूहळू ते विरून जाण्याची शक्‍यता आहे. तरीही पश्‍चिम बंगाल, उडिसा, आंध्र प्रदेश या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवारी (ता.8) सायंकाळी गोपाळपुरापासून आग्नेयकडे 510 किलोमीटर अंतरावर होते. मच्छिलीपटनमपासून आग्नेयकडे 610 किलोमीटर अंतरावर होते. या क्षेत्राच्या वाऱ्याचा वेग ताशी 33 किलोमीटर एवढा होता. त्यामुळे उडिसा, आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावर अधिक हानी होणार नसली तरी, नागरिकांनी सावध राहावे. तसेच मच्छीमारांनी आज आणि उद्या मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर झाला आहे. सध्या राज्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत आठ ते नऊ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली. शुक्रवारी (ता. 8) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे 13.8 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी (ता.8) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई (सांताक्रुझ) 18.0 (7), अलिबाग 20.8 (2), रत्नागिरी 21.6 (1), डहाणू 19.5 (1), भिरा 18.5, नगर 19.6 (7), पुणे 18.2 (7), जळगाव 17.6 (5), कोल्हापूर 19.9 (1), महाबळेश्वर 15.6 (2), मालेगाव 18.0 (7), नाशिक 16.2 (4), सांगली 19.1 (5), सातारा 17.3 (4), सोलापूर 17.3 (2), औरंगाबाद 20.7 (9), बीड 20.2 (8), उस्मानाबाद 14.0, परभणी 18.0 (4), नांदेड 17.0 (4) अकोला 18.6 (5), अमरावती 18.2 (3), बुलढाणा 17.8 (3), चंद्रपूर 17.6 (4), गोंदिया 13.8 (1), नागपूर 16.0 (3), वर्धा 16.4 (2), यवतमाळ 15.8 (1)

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...