agriculture news in marathi, weather, cyclone prediction in Arabian sea, Monsoon | Agrowon

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत
संतोष मुंढे
मंगळवार, 22 मे 2018

पुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ येण्याचे संकेत आहेत. लक्षद्वीप बेटांच्या जवळच्या समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. बुधवारपर्यंत (ता. २३) या भागात चक्रीवादळ तयार होणार असून, हे चक्रीवादळ ओमानकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ येण्याचे संकेत आहेत. लक्षद्वीप बेटांच्या जवळच्या समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. बुधवारपर्यंत (ता. २३) या भागात चक्रीवादळ तयार होणार असून, हे चक्रीवादळ ओमानकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अाग्नेय अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. त्याला लागूनच चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मंगळवारी या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार होणार असून, बुधवारी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २३ ते २६ मे या कालावधीत ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

राज्यात असलेल्या कोरड्या हवामानामुळे तापमानात वाढ होत असून, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला अाहे. विदर्भात लाट अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे. ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात कोरड्या व उष्ण हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सोमवारी (ता. २१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.२, जळगाव ४४.०, कोल्हापूर ३३.२, महाबळेश्वर ३०.८, मालेगाव ४४.८, नाशिक ३९.३, सांगली ३४.४, सातारा ३६.४, सोलापूर ४०.६, मुंबई ३५.४, अलिबाग ३३.९, रत्नागिरी ३३.७, डहाणू ३६.२, आैरंगाबाद ४१.७, परभणी ४५.०, नांदेड ४३.५, अकोला ४४.७, अमरावती ४४.६, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४७.१, चंद्रपूर ४७.८, गोंदिया ४४.२, नागपूर ४६.२, वर्धा ४५.६, यवतमाळ ४४.५. 

अंदमानात मॉन्सून २३ एेवजी २५ला?
नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) बुधवारपर्यंत (ता. २३) रोजी अंदमानात दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने यापूर्वीच दिले आहेत. मात्र हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे मॉन्सूनचे अागमन काहीसे लांबण्याची शक्यता आहे. सध्य स्थितीनुसार माॅन्सून वारे अंदमानात गुरुवारी (ता. २४) किंवा शुक्रवारी (ता. २५) दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. परिणामी शुक्रवारी (ता. २५) अंदमान निकोबार बेटांवर जाेरदार पावसाची शक्यता आहे. हवामानात हाेत असलेले बदल, वाऱ्यांची दिशा, पावसाचे प्रमाण यावर मॉन्सूनची वाटचाल ठरत असते. त्याचा मॉन्सूनच्या आगमनावरील परिणामावर हवामान शास्त्रज्ञ सातत्याने लक्ष ठेऊन आहेत.

इतर अॅग्रो विशेष
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
कपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...
जिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशा?नगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...
भातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...
'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...
बोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...
शेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...
दुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...
कर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...
सोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...
चीनला पाच लाख टन साखर निर्यातीच्या...पुणे: राज्यातील अतिरिक्त साखरेची निर्यात चीनला...
ट्रॅक्टरला अनुदान सव्वा लाखच पुणे : देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी पाच...