agriculture news in marathi, weather, depression in Arabian sea | Agrowon

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

पुणे : अरबी समुद्रामध्ये नैर्ऋत्य भागात सोमवारी (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता ४८ तासांमध्ये वाढणार आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने विदर्भात बुधवारपर्यंत (ता. १६) हलक्या पावसाची शक्यता असून, गुरुवारी (ता. १७) उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : अरबी समुद्रामध्ये नैर्ऋत्य भागात सोमवारी (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता ४८ तासांमध्ये वाढणार आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने विदर्भात बुधवारपर्यंत (ता. १६) हलक्या पावसाची शक्यता असून, गुरुवारी (ता. १७) उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राला लागत समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र अदानच्या अाखाताकडे सकण्याचे संकेत आहेत. ४८ तासांमध्ये तीव्रता वाढणाऱ्या या कमी दाबक्षेत्रामुळे भारतीय उपखंडावर जास्त प्रभाव पडणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र केरळ लगतच्या समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब आणि परिसरावर वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांपासून वायव्य राजस्थान, पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्रापर्यंत उत्तर दक्षिण हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह राज्यात ढगाळ हवामान होत आहे.

बुधवारपर्यंत विदर्भात तर गुरुवारपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ढगाळ हवामान आणि पावसामुळे विदर्भाच्या तापमानात घट होत असून, सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला उच्चांकी ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.४, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्वर ३३.०, मालेगाव ४२.२, नाशिक ३९.२, सांगली ३६.४, सातारा ३९.२, सोलापूर ४१.१, मुंबई ३४.६, अलिबाग ३५.०, रत्नागिरी ३४.४, डहाणू ३५.०, औरंगाबाद ४०.६, परभणी ४३.६, नांदेड ४१.५, अकोला ४३.७, अमरावती ४३.४, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४३.५, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४३.२, नागपूर ४२.९, वर्धा ४३.५, यवतमाळ ४२.५.

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...