agriculture news in marathi, weather, fifteen centers faces more than 40 degree temperature | Agrowon

राज्यात पंधराहून अधिक ठिकाणी पारा चाळिशीपार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 मार्च 2018

पुणे : राज्यात वाढत्या तापमानाचा अालेख सातत्याने वर जात आहे. बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तापमान ३८ अंशांपेक्षा अधिक होते. राज्यातील १५ हून अधिक ठिकाणी तापमान चाळिशीपार गेले आहे. विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. 

पुणे : राज्यात वाढत्या तापमानाचा अालेख सातत्याने वर जात आहे. बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तापमान ३८ अंशांपेक्षा अधिक होते. राज्यातील १५ हून अधिक ठिकाणी तापमान चाळिशीपार गेले आहे. विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. 

उन्हाचा चटका वाढल्याने दिवसा होरपळ अाणि उकाड्यात वाढ झाली आहे, तर सायंकाळनंतर वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे रात्रीचे तापमान सरीसरीपेक्षा कमी झाले आहे. राज्यात रात्रीचे किमान तापमान १७ ते २५ अंशांच्या आसपास आहे. दिवसाचे वाढलेले आणि रात्रीची कमी तापमान यामुळे तापमानातील तफावत पुन्हा २० ते २३ अंशांपर्यंत वाढली आहे. विदर्भ, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान चाळिशीच्यावर गेले आहे. 

कोकणात मात्र दिवसाच्या तापमानात मोठी घट झाली. मंगळवारी (ता. २७) तापमान ४५ अंशांवर गेलेल्या भिरा येथे बुधवारी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, मालेगाव, सोलापूर, येथे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, शुक्रवारी (ता. ३०) आणि शनिवारी (ता. ३१) विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

बुधवारी (ता. २८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.७, नगर ४१.५, जळगाव ४०.८, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्वर ३२.४, मालेगाव ४१.४, नाशिक ३८.५, सांगली ३८.४, सातारा ३९.१, सोलापूर ४०.७, मुंबई (सांताक्रुझ) ३२.७, अलिबाग ३३.०, रत्नागिरी ३२.८, डहाणू ३२.६, भिरा ४१.०, औरंगाबाद ३८.६, परभणी ४१.२, नांदेड ४०.०, अकोला ४१.६, अमरावती ४०.४, बुलडाणा ३९.६, चंद्रपूर ४१.२, गोंदिया ३८.५, नागपूर ४०.२.

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...
सुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...
शेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...
निर्यात कोट्यावरून साखर उद्योगात घमासानपुणे : देशात साखरेचा अफाट साठा तयार होत असताना...
शेतकऱ्यांचा जीवनसंघर्ष २०१८ मध्येही...मुंबई : गेल्या चार वर्षांत सिंचन सोडून कृषीच्या...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या...
हवामान बदलांमुळे दारिद्र्य वाढण्याचा...नवी दिल्ली : हवामानबदलांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे...
हिमवृष्टीमुळे काश्‍मीर, हिमाचल गारठले;...नवी दिल्ली : हिमवृष्टीमुळे काश्‍मिरसह हिमाचल...
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...