गुरुवारपर्यत काही ठिकाणी हलक्‍या पावसाचा अंदाज
संदीप नवले
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पुणे ः राज्यात हवेचा दाब वाढत आहे. त्यामुळे पावसाचा जोर ओसरत आहे. येत्या गुरुवार (ता. 28) पर्यत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पाऊस पडेल. रविवारी (ता. 24) सोलापूर, कोल्हापूरमध्ये हलका पाऊस झाला.

पुणे ः राज्यात हवेचा दाब वाढत आहे. त्यामुळे पावसाचा जोर ओसरत आहे. येत्या गुरुवार (ता. 28) पर्यत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पाऊस पडेल. रविवारी (ता. 24) सोलापूर, कोल्हापूरमध्ये हलका पाऊस झाला.

गेल्या दोन ते तीन पावसापासून पावसाने राज्यातील अनेक भागांत उघडीप दिली आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी ढगाळ हवामान असून अनेक ठिकाणी ऊन पडत आहे. आज (ता. 25) कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. उद्या (ता.26) कोकण, गोवा व मध्यम महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका पावसाचा अंदाज आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रविवारी (ता. 24) ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते. तर घाटमाथ्यावर पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर येथे जोरदार पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली,
जिल्ह्यातही ऊन, सावल्याचा खेळ सुरू होता. खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासून ऊन पडल्याचे चित्र होते.

मराठावाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात हवामान कोरडे असून अनेक भागात ऊन पडल्याचे चित्र होते. काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. विदर्भातही नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा जिल्हयातील बहुतांशी ठिकाणी हवामान कोरडे होते. तर अनेक ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते. त्यामुळे हवामानात उकाडा वाढला असून विदर्भ व मराठवाड्यातील कमाल तापमानातही किंचित वाढ झाली आहे.

रविवारी (ता.24) सकाळपर्यत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
मध्य महाराष्ट्र ः बार्शी 50, जामखेड 40, मंगळवेढा, फलटण, सांगोला, विटा 30, जत, खटाव, वडूज, शिरोळ 20, कागल, कवठेमहाकाळ 10.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...