agriculture news in marathi, weather forecast | Agrowon

उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा राज्यात प्रभाव
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018
पुणे  ः उत्तर भारतातील हिमालय, दिल्ली, चंडीगड, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या भागांत थंडीची लाट आहे. या लाटेमुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. राज्यातील काही भागांत पुन्हा थंडी काही प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परिसरात ७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
पुणे  ः उत्तर भारतातील हिमालय, दिल्ली, चंडीगड, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या भागांत थंडीची लाट आहे. या लाटेमुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. राज्यातील काही भागांत पुन्हा थंडी काही प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परिसरात ७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तयार झालेले ढगाळ हवामान विरून गेले आहे. सध्या राज्यात पुन्हा कोरडे हवामान आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा काही प्रमाणात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह वाहत असल्याने येत्या काही दिवस थंडी अशीच कमीअधिक होण्याची शक्यता आहे. मात्र किमान तापमानात घट झाली असली, तरी काही प्रमाणात कमाल तापमानात किंचित वाढ होण्यास सुरवात झाली आहे. दुपारी चांगलाच उन्हाचा चटका नागरिकांना जाणवू लागला आहे. 
 
सध्या अरबी समुद्रावरून बाष्प कोकणातील काही भागाकडे वाहत आहे. कोकणातील थंडीत चढउतार होत आहे. मुंबई, रत्नागिरी येथे थंडीत किंचित वाढली आहे. अलिबाग, भिरा, डहाणू येथे थंडी कमी झाली आहे. भिरा येथे १५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत येथील थंडी कमीअधिक होणार असून, पुढील आठवड्यापासून थंडी गायब होण्यास सुरवात होईल. 
 
उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मध्य महाराष्ट्रातील काही भाग व खानदेश या भागात किंचित थंडी वाढली आहे. निफाड येथे सर्वांत कमी ७.८ अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव येथील किमान तामपानात किंचित वाढ झाली आहे. 
 
मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरलेला आहे. मराठवाड्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. उस्मानाबादमध्ये किमान तापमान सरासरीएवढे होते. परभणी शहरामध्ये १०.९ अंश सेल्सिअसची एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. 
 
विदर्भातील बहुतांशी भागात आर्द्रता कमी होत असल्याने गेल्या दोन दिवसापासून थंडी कमी होण्यास सुरवात झाली आहे. सध्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा पारा दहा अंशांच्या वर गेला आहे. मात्र सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घट झाली असली, तरी गोंदिया येथे १०.१ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 
 
गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १५.८ (-१), रत्नागिरी १७.१(-२), भिरा १५.०, पुणे ९.२ (-२), नगर ८.४ (-५), जळगाव ८.७ (-४), कोल्हापूर १५.६, महाबळेश्वर १५.५ (२), मालेगाव १२.५ (१), नाशिक ९.४ (-१), निफाड ७.८, सांगली १३.५ (-१), सातारा १०.५ (-३), सोलापूर १३.१ (-४), औरंगाबाद १२.० (-१),  परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) ७.५, परभणी शहर १०.९ (-५), नांदेड १२.० (-२), अकोला १२.४ (-३), अमरावती १३.२ (-३), चंद्रपूर १२.०(-४), नागपूर १०.२ (-४).
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...