agriculture news in marathi, weather forecast | Agrowon

राज्यात बुधवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पुणे : मालदीव ते अरबी समुद्र आणि कर्नाटकाचा परिसर या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बुधवारी (ता. ७) दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.

पुणे : मालदीव ते अरबी समुद्र आणि कर्नाटकाचा परिसर या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बुधवारी (ता. ७) दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तामपानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. आज आणि उद्या गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच पुन्हा गुरुवार (ता. ८) नंतर गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होऊ लागला आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे १०.२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत वाऱ्याचा प्रवाहात किंचित बदल होणार असून, वारे उत्तरेएेवजी आता नैर्ऋत्येकडून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात किंचित वाढ होईल. त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागणार आहे.

रविवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १७.०, अलिबाग १९.१, रत्नागिरी १८.३, भिरा १६.०, डहाणू १८.७, पुणे १२.५, जळगाव १०.२, कोल्हापूर १६.५, महाबळेश्वर १६.०, मालेगाव १४.६, नाशिक ११.३, सांगली १४.५, सातारा १२.३, सोलापूर १६.९, औरंगाबाद १४.६, परभणी शहर ११.९, नांदेड १५.५, उस्मानाबाद १२.१, अकोला १४.७, अमरावती १६.४, बुलडाणा १६.०, चंद्रपूर १७.२, गोंदिया ११.६, नागपूर १२.५, वर्धा १३.४, यवतमाळ १४.४ 

इतर अॅग्रो विशेष
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...