agriculture news in marathi, weather forecast | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

पुणे : बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या दक्षिण भागाकडे चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उत्तरेकडील बाष्पयुक्त वारे दक्षिणेकडे खेचले जात आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ हवामान तयार झाले आहे. आज (ता. ६) कोकणातील रत्नागिरी, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

पुणे : बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या दक्षिण भागाकडे चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उत्तरेकडील बाष्पयुक्त वारे दक्षिणेकडे खेचले जात आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ हवामान तयार झाले आहे. आज (ता. ६) कोकणातील रत्नागिरी, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

बंगाल उपसागराच्या नैर्ऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच अरबी समुद्र, कर्नाटक ते मालदीव परिसर या भागांतही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तर पाकिस्तान, हिमालय या भागांतही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. पंजाब व हरियानाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्याचा परिणाम राज्यातील किमान तामपानावर झाला आहे.

कोकणात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. भिरा येथे १७.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत थंडी गायब झाली असून, किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या वर गेला आहे. निफाड येथे १२.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

मराठवाड्यातील परभणी येथे किंचित थंडी आहे. त्यामुळे परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात ११.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, नांदेड येथील किमान तामपानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. विदर्भातील बहुतांशी भागातून थंडी परतली आहे. त्यामुळे
किमान तामपान वाढू लागले आहे. अकोला, वर्धा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. उर्वरित अमरावती, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथील किमान तापमानही कमी झाले आहे.

मंगळवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १९.० (२), अलिबाग २०.२ (३), रत्नागिरी १८.४ (-१), भिरा १७.५ (२), डहाणू १९.३ (२), पुणे १३.५ (२), नगर १३.७ (१), जळगाव १२.८, कोल्हापूर १६.३, महाबळेश्वर १६.२ (२), मालेगाव १५.२ (४), नाशिक १३.८ (३), निफाड १२.०, सांगली १४.६, सातारा १२.४ (१), सोलापूर १५.६ (-२), औरंगाबाद १५.० (२), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) ११.८, परभणी शहर १२.४ (-३), नांदेड १५.५ (१), उस्मानाबाद १०.७, अकोला १७.७ (२), अमरावती १७.४(१), बुलडाणा १७.८, चंद्रपूर १६.४, गोंदिया १६.० (१), नागपूर १६.० (१), वाशीम १३.६, वर्धा १६.८ (२), यवतमाळ १७.४ (१)

राज्यात शनिवारीही पावसाची शक्यता
ढगाळ हवामानाचा प्रभाव तीन ते चार दिवस राहणार आहे. राज्यात गुरुवारी (उद्या) आणि शुक्रवारी हवामान ढगाळ राहणार आहे. शनिवारी (ता. ९) दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही हवामान ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...