मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या मार्गावर असून, लवकरच हापूस ‘कोकण’चाच यावर
अॅग्रो विशेष
पुणे : कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे असून, वारे उत्तरेकडून वाहत आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीत वाढ होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी काही भागांत थंड असलेल्या शेकोट्या पेटू लागणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पुणे : कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे असून, वारे उत्तरेकडून वाहत आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीत वाढ होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी काही भागांत थंड असलेल्या शेकोट्या पेटू लागणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी आहे. किमान तापामानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घट झाली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात एक ते दोन अंशाने घट झाली आहे; परंतु कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान ढगाळ हवामान आहे. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील काही भाग वगळता उर्वरित भागात थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरवात केली आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरात शुक्रवारी (ता. 22) आकाश अंशतः ढगाळ होते. येत्या रविवारपर्यंत (ता. 24) पुणे परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, त्यानंतर हवामान ढगाळ राहील.
शुक्रवार ठरला सर्वांत लहान दिवस
शुक्रवारी (ता. 22) रोजी वर्षातील सर्वांत लहान दिवस असल्याने याच दिवशी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला विंटर सोल्स्टाईल असे म्हणतात. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा सर्वांत लहान व रात्र ही सर्वांत मोठी असते. 22 डिसेंबरचा दिवस हा 10 तास 47 मिनिटांचा असतो. दिवस व रात्रीचा कालावधी कमी- जास्त होतो. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशाने कललेला असल्याने हे घडत असते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे दक्षिणायन व उत्तरायणसुद्धा आपल्याला अनुभवता येते. बावीस डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा वर्षातील सर्वात लहान व रात्र ही सर्वात मोठी असते. या दिवसाला हिवाळा अयन दिवस असेसुद्धा म्हणतात.
शुक्रवारी (ता. 22) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) 16.5 (-1), अलिबाग 17.8, रत्नागिरी 18.7 (-1), डहाणू 18.0, भिरा 15.0 (-2), पुणे 10.5, जळगाव 10.2 (-2), कोल्हापूर 14.9, महाबळेश्वर 13.0 (-1), मालेगाव 12 (1), नाशिक 11.2 (1), सांगली 12.7 (-1), सातारा 11.0 (-2), सोलापूर 12.5 (-5), औरंगाबाद 12.0 (1), परभणी 11.5 (-2), नांदेड 12.0, उस्मानाबाद 8.7, अकोला 12.0 (-1), अमरावती 42.6, बुलडाणा 14.0, चंद्रपूर 13.8 (1), गोंदिया 10.8 (-1), नागपूर 10.2 (-3), वर्धा 12.2 (-1), यवतमाळ 14.4
- 1 of 128
- ››