agriculture news in marathi, weather, forecast, climate | Agrowon

विदर्भातील तुरळक भागात उद्या पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यातील वातावरणामधील काेरडेपणा बराेबरच थंडीचा कडाका वाढत आहे. सोमवारी (ता. १३) सर्वांत कमी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. पुढील दाेन दिवसांत बुधवार (ता. १५) आणि गुरुवार (ता. १६) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील तापमान काेरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

पुणे : राज्यातील वातावरणामधील काेरडेपणा बराेबरच थंडीचा कडाका वाढत आहे. सोमवारी (ता. १३) सर्वांत कमी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. पुढील दाेन दिवसांत बुधवार (ता. १५) आणि गुरुवार (ता. १६) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील तापमान काेरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

साेमवार (ता. १३) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. तर काेकण गाेव्याच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या उर्वरित भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तसेच मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून, राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते.

राज्याच्या विविध भागांत गेल्या २४ तासांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे ः
मुंबई २२, अलिबाग १८.८, रत्नागिरी १७.९, पणजी २०, डहाणू १८.४, भिरा १५.५, पुणे ११.४, नगर १०.७, जळगाव १३, काेल्हापूर १५.५, महाबळेश्‍वर १३.६, मालेगाव १४, नाशिक १०.२, सांगली १३.६, साेलापूर १३.१, आैरंगाबाद १३, परभणी १२.५, नांदेड १४.५, बीड ११.९, अकाेला १३.७, अमरावती १६.२, बुलडाणा १४.६, ब्रह्मपुरी १४.३, चंद्रपूर १६.६, गाेंदिया १२.६, नागपूर १२.९, वाशीम १५, वर्धा १३.६, यवतमाळ १२.२

 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...
शेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित...सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा, गुजरात) :...
व्यवसायाचे तंत्र शेतीच्या नियोजनात ठरले...नाशिक येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळून नरेंद्र...