विदर्भात पुढील आठवड्यापासून थंडीत घट

विदर्भात पुढील आठवड्यापासून थंडीत घट
विदर्भात पुढील आठवड्यापासून थंडीत घट

पुणे : विदर्भातील अनेक भागांत कोरडे हवामान आहे. थंडीत किंचित वाढ झाली आहे. येत्या काही दिवस ती कायम राहणार असून, पुढील आठवड्यानंतर थंडी कमी होण्यास सुरवात होईल. गुरुवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे ८.२ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, मध्य महाराष्ट्र या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मराठवाड्यातील काही भागांतही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित चढ-उतार सुरू आहे. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या सोमवारपर्यंत (ता. १५) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात बुधवार(ता. १७)पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहील. सध्या हवेतील ओलावा कमी असल्याने कोकणातील किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास पाच अंशांनी वाढ झाली आहे. डहाणूमध्ये १९.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर वगळता उर्वरित कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंशांनी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील परभणी शहरात १२.४ तर कृषी विद्यापीठाच्या आवारात ११.२ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी वाढ झाली आहे. विदर्भातील सर्वच शहराचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी घटला. ------------- गुरुवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १९.४ (२), अलिबाग २०.२ (३), रत्नागिरी २०.८ (२), भिरा २०.५ (५), डहाणू १९.० (१), नगर ११.४(-१), पुणे १३.५ (३), जळगाव १०.० (-२), कोल्हापूर १८.५ (४), महाबळेश्वर १५.२ (२), मालेगाव १३.० (२), नाशिक ११.६ (२), निफाड १०.६, सांगली १७.२ (४), सातारा १५.५ (५), सोलापूर १७.३(१), औरंगाबाद १३.० (२), बीड १२.६, उस्मानाबाद ११.३, परभणी (कृषी विद्यापीठ आवार) ११.२, परभणी शहर १२.४ (-२), नांदेड १३.५, अकोला १२.८(-२), अमरावती १३.४ (-१), बुलढाणा १३.४(-१), चंद्रपूर १०.८ (-३), गोंदिया ८.२ (-४), नागपूर ११.१ (-२), वर्धा १२.४, यवतमाळ १३.४ (-१). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com