agriculture news in marathi, weather, forecast, cold, temperature | Agrowon

थंडी कमी होण्यास सुरवात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जानेवारी 2018

पुणे : कोरड्या हवामानामुळे हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. विदर्भातील काही भागात थंडी असली तरी, किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : कोरड्या हवामानामुळे हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. विदर्भातील काही भागात थंडी असली तरी, किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेकडे असलेला सूर्य उत्तरेकडे सरकू लागला आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भातील बहुतांशी भागातील किमान तापमान सरासरी एवढे, तर काही शहरांचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंशापर्यंत घटले होते. येत्या मंगळवारपर्यंत (ता.१६) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात बुधवारपर्यंत (ता.१७) आकाश मुख्यत निरभ्र राहील. 

कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत जवळपास चार अंशांपर्यंत वाढ झाली. भिरामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढ होऊन १९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंशांपर्यंत वाढ झाली आहे. जळगाव येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. 

मराठवाड्यातील औरंगाबाद येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी वाढ झाली. उस्मानाबाद, नांदेड येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घटले होते. परभणीतील कृषी विद्यापीठाच्या परिसरात ११.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भातील अकोला, वर्धा, अमरावती येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी घटले होते. 

शुक्रवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) २०.२ (३), अलिबाग २०.५ (३), रत्नागिरी २१.७ (३), भिरा १९.५ (४), डहाणू २०.८ (४), नगर १४.० (२), पुणे १५.५ (५), जळगाव ११.६, कोल्हापूर २१.२ (६), महाबळेश्वर १६.४ (३), मालेगाव १४.० (३), नाशिक १२.८ (३), सांगली १९.६ (६), सातारा १८.० (५), सोलापूर १८.० (२), औरंगाबाद १४.२ (३), उस्मानाबाद १२.७,  परभणी (कृषी विद्यापीठ आवार) ११.६, परभणी शहर १३.४ (-१), नांदेड १३.५, अकोला १४.१,  अमरावती १४.१, बुलडाणा १५.२ (१), चंद्रपूर १०.८ (-४), गोंदिया ९.४ (-२), नागपूर ११.० (-२), वर्धा १३.८, यवतमाळ १३.४ (-२)

इतर अॅग्रो विशेष
हिरवे स्वप्न भंगताना...ढोबळ्या मिरचीला भाव नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील...
विहिरींद्वारे महाराष्ट्र होईल जलमयराज्यात शक्‍य अशा सर्व ठिकाणी धरणे झाली....
‘स्मार्ट व्हिलेज’मधील गावांत इजिप्तच्या...टाकळी हाजी/आळेफाटा, जि. पुणे ः सकाळ माध्यम...
काबुली हरभरा आयात शुल्क ६० टक्क्यांवरनवी दिल्ली ः हरभरा आवक बाजारात सुरू झाल्यापासूनच...
राज्यात उन्हाचा चटका वाढलापुणे : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात उन्हाचा...
गाळ काढण्यासाठी सुरुंग; `जलयुक्त’ला...पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जलयुक्त...
दहा हजारांहून अधिक गावांची पाणीपातळी...पुणे : उन्हाचा चटका वाढू लागला असून,...
भाजीपाला उत्पादक खचलाकोल्हापूर : एकेकाळी भाजीपाल्याचे वैभव शिरावर घेऊन...
सांगलीतील बेदाणा सौद्याची पंतप्रधान...सांगली ः येथील बेदाण्याच्या ऑनलाइन सौद्याची...
यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून...कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या कवठेगावाने शेती,...
शेती क्षेत्रातील रोजगारासाठी युवकांना...नवी दिल्ली ः शेती क्षेत्रातील कुशल कामगारांची...
साखर निर्यात शुल्क हटविलेकोल्हापूर: साखरेच्या निर्यातीवर असणारे वीस टक्के...
बाजारात फ्लाॅवर कोमेजला; टोमॅटोची उतरली...कोल्हापूर/नाशिक : गेल्या काही दिवसांपासून...
बीटी कापूस बियाण्यांना डीएनए चाचणी...पुणे : बीटी कापूस बियाण्यांच्या विक्रीतील...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्यात हवामान निरभ्र आणि कोरडे होत...
आंतरराष्ट्रीय बाजारात रुईला ‘ऑन’चे दरजळगाव ः आंतरराष्ट्रीय कापूस बाजारातही केळी...
पुन्हा एकदा वळूया वृक्षसंवर्धनाकडेदेशाची प्रगती करावयाची असेल तर कृषीचा विकास...
आश्वासनांवरच जगतोय शेतकरीशेतीची दुरवस्था, महागाई, वाढती बेरोजगारी आणि...
‘एक्झॉटिक’ भाजीपाला शेतीतून वेगळी वाट...सांगली जिल्ह्यातील शिगाव (ता. वाळवा) येथील...
आक्रमक शेतकऱ्यांनी बंद पाडले ट्रॅक्टर्स...नामपूर, जि. नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी...