agriculture news in marathi, weather forecast, fluctuation in minimum temperature | Agrowon

थंडीत चढ-उताराची शक्यता
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018

पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या वाऱ्याचा प्रवाह कमी होण्यास सुरवात झाली आहे. या आठवड्यात थंडी किंचित कमी होऊन परत किंचित वाढेल. सध्या ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. मात्र, जसजसे आकाश निरभ्र होईल, तसतसे थंडीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ८.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : उत्तरेकडून वाहत असलेल्या वाऱ्याचा प्रवाह कमी होण्यास सुरवात झाली आहे. या आठवड्यात थंडी किंचित कमी होऊन परत किंचित वाढेल. सध्या ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली आहे. मात्र, जसजसे आकाश निरभ्र होईल, तसतसे थंडीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ८.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

श्रीलंकेजवळ ढग दाटून आले आहेत. तसेच, त्याखाली हिंदी महासागरात एक चक्राकार वाऱ्याचे रूप धारण करत आहे. परंतु, त्याची तीव्रता अधिक नसेल. उत्तर ऑस्ट्रेलिया व फिलिपिन्स देशाजवळ जी चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे, ती भारताच्या किंबहुना महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम करेल. ते चक्रीवादळ पाण्याची वाफ व ढग आपल्याकडे खेचण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाऱ्यांचा वेग वाढेल.

सध्या महाराष्ट्रावर पाण्याची वाफ कमी असल्याने थंडी जास्त आहे. या परिस्थितीत कर्नाटकाचा उत्तर भाग व महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे काही प्रमाणात वातावरण थोडेसे ढगाळ होऊन थंडी कमी होईल. मागील आठवड्यामध्ये हिमालयात बर्फवृष्टी होत होती. वाऱ्याचा वेग हिमालयाकडून महाराष्ट्रावरील भागाकडे होता. त्यामुळे हिमालयातील वारे महाराष्ट्रावर येताना थंडी वाहून आणत होते. येत्या काही दिवसांत वाऱ्याची दिशा बदलत असून, ती येत्या काही दिवसांत नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहण्यास सुरवात होईल.

रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १५.० (-२), अलिबाग १७.६, रत्नागिरी १७.३ (-२), भिरा १४.५ (-१), डहाणू १४.८ (-२), पुणे ११.१, जळगाव ८.४ (-४), कोल्हापूर १७.१ (-१), महाबळेश्वर १३.६, मालेगाव ११.८ (१), नाशिक ९.७ (-१), निफाड ९.४, सांगली १४.२, सातारा १२.४ (-१), सोलापूर १४.७ (-२), औरंगाबाद ११.० (-१), परभणी शहर १०.० (-५), नांदेड १२.० (-२), उस्मानाबाद ९.९, अकोला ११.६ (-३), अमरावती १४.२ (-१), बुलडाणा १३.४ (-२), चंद्रपूर १२.० (-३), गोंदिया ८.६ (-६), नागपूर ८.५ (-६), वर्धा १०.९ (-३), यवतमाळ १२.० (-४)

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...