agriculture news in marathi, weather forecast, fluctuation in minimum temperature | Agrowon

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होतोय
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पुणे : दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा उत्तर भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्याची क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी थंडी कमीअधिक असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा उत्तर भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्याची क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी थंडी कमीअधिक असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

सध्या विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आहे. ही लाट अजून एक दोन राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडीची तीव्रता कमी होण्यास सुरवात होईल. विदर्भातील गोंदिया आणि मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ८.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. संक्रांतीनंतर थंडी कमी होण्यास सुरवात झाली होती. परंतु, गेल्या आठवड्यात पुन्हा काही प्रमाणात थंडी परतली होती. मात्र, आता थंडी कमी होण्यास सुरवात झाली असली तरी कमाल तापमानात किंचित वाढ होण्यास सुरवात झाली आहे. थंडीमुळे दुपारी उन्हाचा चटका सुखद वाटू लागला असला तरी सायंकाळी पुन्हा काही प्रमाणात थंडी जाणवत आहे. रात्री दहानंतर थंडीत किंचित वाढ होत जाऊन पहाटे किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली उतरत आहे.  

कोकणातील मुंबई, रत्नागिरी, भिरा येथील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत एक दोन अंश सेल्सिअसने घटला आहे. भिरा येथे १५.० अंश सेल्सिअस एवढे किमान तापमानाची नोंद झाली आहे. अलिबाग व डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढला आहे. 

मध्य महाराष्ट्रातील दक्षिण कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले. नगर, जळगाव, नाशिक आणि सातारा येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घटले. निफाड, नाशिक, जळगाव येथील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली होता. 

मराठवाड्यातील बीड, परभणी येथे थंडीचा प्रभाव अजूनही कायम आहे. औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद येथे काही प्रमाणात थंडी कमी झाली आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात सर्वात कमी १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील बहुतांशी सर्वच जिल्ह्यांत थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानाचा पारा आठ अंशांपर्यंत खाली आला आहे. नागपूर, ब्रह्मपुरी आणि गोंदिया येथील किमान तापमान दहा अंशाच्या खाली होते. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमान दहा अंशांच्यावर होते. 

सोमवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) १६.० (-१), अलिबाग १८.४ (१), रत्नागिरी १७.६ (-२), भिरा १५.० (-१), डहाणू १७.० (२), पुणे ११.५, नगर १०.१ (-३), जळगाव ९.० (-४), कोल्हापूर १६.९ (१), महाबळेश्वर १४.६ (१), मालेगाव १२.४ (१), नाशिक ९.९ (-१), निफाड ८.०, सांगली १५.३ (१), सातारा १२.९ (-१), सोलापूर १६.७, औरंगाबाद १२.६ (१), बीड १०.३ (-४), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १०.१, परभणी शहर ११.० (-५), नांदेड १४.५, उस्मानाबाद १२.९, अकोला १२.५ (-२),  अमरावती १४.०, बुलढाणा १५.० (-२), चंद्रपूर १३.२ (-२), गोंदिया ८.० (-६), नागपूर ९.३ (-५), वाशीम  १०.६, ब्रह्मपुरी ९.८, वर्धा १०.१ (-४), यवतमाळ १३.४ (-३)
 

इतर अॅग्रो विशेष
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...
आधी धान्य घ्या, पैसे ऊस बिलातून घेतो...कोल्हापूर : केवळ उसाचे उत्पादन घेतल्याने आलेल्या...
खरीप आढावा बैठका जिल्हाधिकारी घेणारपुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीप...
कृषिसेवक भरतीला न्यायाधीकरणाची मनाईपुणे : कृषिसेवक पदासाठी झालेल्या परीक्षेच्या...
लिंबावर काळ्या माशीचा प्रादुर्भावअकोला: लिंबू बागांमध्ये सध्या आंबिया बहर...
विदर्भात आज वादळी पावसाची शक्यतापुणे : वातावरणाच्या खालच्या थरात होत असलेल्या...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
आत्मदहनाचा इशारा देणारे २३ शेतकरी...बुलडाणा: जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या...
‘ग्रीन होम एक्स्पो’ला पुण्यात प्रारंभपुणे : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने सेकंड होम,...
रेपो रेटघटीचा लाभ कोणाला?केंद्रीय अर्थसंकल्प, रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक...
यांत्रिकीकरण ः वास्तव आणि विपर्याससध्या राज्यभर विविध योजनांमधून अवजारे अनुदान...