agriculture news in marathi, weather forecast, hailstorm alert | Agrowon

मध्य महाराष्ट्रात आजपासून गारपिटीचा अंदाज 
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावला सावधानतेचा इशारा
पुणे (प्रतिनिधी)ः लक्षद्वीप परिसर ते मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र कर्नाटक आणि कोकणचा दक्षिण भागातही दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून (ता.२३) मध्य महाराष्ट्राच्या नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्याच्या काही भागांत गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावला सावधानतेचा इशारा
पुणे (प्रतिनिधी)ः लक्षद्वीप परिसर ते मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र कर्नाटक आणि कोकणचा दक्षिण भागातही दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून (ता.२३) मध्य महाराष्ट्राच्या नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्याच्या काही भागांत गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

कोकणात समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. बंगालचा उपसागर आणि दक्षिण तमिळनाडू श्रीलंका भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. लक्षद्वीप परिसर ते अरबी समुद्र दक्षिण महाराष्ट्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र लक्षद्वीपकडून गुजरातच्या दिशेने सरकत आहे. बांगलादेशाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. 

उद्या (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद व विदर्भातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. रविवारी (ता.२५) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सोमवार (ता.२६) पासून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे वातावरणात चांगलाच उकाडा वाढत असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ११.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. 

बुधवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १९.६ (१), अलिबाग २०.८ (२), रत्नागिरी २०.४ (१), भिरा १८.० (२), डहाणू २०.० (१), पुणे १४.५ (२), नगर १४.५, जळगाव १३.६ (-१), कोल्हापूर २०.० (३), महाबळेश्वर १७.२ (३), नाशिक १४.३ (२), निफाड ११.४, सांगली १९.१ (३), सातारा १६.१ (१), सोलापूर २०.२ (२), औरंगाबाद १७.६ (३), बीड १६.४ (१), उस्मानाबाद १५.३, परभणी शहर १७.५, नांदेड २०.० (४), अकोला १९.६ (३), अमरावती १९.४ (१), बुलडाणा १९.० (२), चंद्रपूर २१.० (४), गोंदिया १४.५ (-२), नागपूर १४.७ (-१), वर्धा १६.२, यवतमाळ १८.४ (१). 
 

इतर अॅग्रो विशेष
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...