agriculture news in marathi, weather forecast, hailstrom alert in Madhya Maharashtra, Marathwada, Vidharbha region | Agrowon

वादळी वारे, गारपिटीची शक्यता वाढली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पुणे : मालदीव परिसर ते अरबी समुद्र, कर्नाटक यादरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागांवर होणार आहे. येत्या शनिवार (ता. १०) ते सोमवार(ता. १२)दरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

पुणे : मालदीव परिसर ते अरबी समुद्र, कर्नाटक यादरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागांवर होणार आहे. येत्या शनिवार (ता. १०) ते सोमवार(ता. १२)दरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

मध्य प्रदेशच्या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच कोकणातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. बंगालचा उपसागर आणि श्रीलंका यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तरेकडील पंजाबच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तान या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. 

शनिवारी सायंकाळी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये तसेच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये या दिवशी गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे. रविवार (ता. ११) व सोमवारी (ता. १२) या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट होण्याच्या शक्यतेसह या वाऱ्याची तीव्रता अधिक असेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये या दोन्ही दिवशी अधूनमधून वादळी वारे वाहण्याची व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी (ता. १३) वादळी वाऱ्याची तीव्रता कमी होईल, तर बुधवार(ता. १४ पासून हवामान सर्वसाधारण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापणीवर आलेल्या ज्वारीसारख्या पिकांची कापणी करून धान्य योग्यरीत्या साठवावे. शेतमालाच्या व्यापाऱ्यांनीदेखील शेतमालाची संरक्षितपणे साठवणूक करावी. नागरिकांनी वादळी वारे, विजा आणि गारपिटीपासून स्वत:सह गुराढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

राज्यात आज (शुक्रवार) दिवसभर आकाश निरभ्र राहणार आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.मध्य महाराष्ट्रातील नगर येथे ९.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. 

गुरुवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपयर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १८.२ (१), अलिबाग १९.८ (२), रत्नागिरी १८.१ (-१), भिरा १६.० (१), डहाणू १७.२, पुणे ११.५, नगर ९.८ (-३), जळगाव १३.०, कोल्हापूर १६.० (१), महाबळेश्वर १२.५ (-१), मालेगाव १५.२ (४), नाशिक १२.४ (२), निफाड १०.६, सांगली १४.९, सातारा ११.४ (-२), सोलापूर १४.५ (-३), औरंगाबाद १३.५ (१), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १०.५, परभणी शहर १३.४(-२), नांदेड १४.० (-१), उस्मानाबाद १०.८, अकोला १५.५,  अमरावती २०.२ (४), बुलडाणा १५.२ (-१), चंद्रपूर १५.४ (-१), गोंदिया १५.२, नागपूर १४.३, वर्धा १४.२, यवतमाळ १८.४ (२).

इतर अॅग्रो विशेष
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...
आधी धान्य घ्या, पैसे ऊस बिलातून घेतो...कोल्हापूर : केवळ उसाचे उत्पादन घेतल्याने आलेल्या...
खरीप आढावा बैठका जिल्हाधिकारी घेणारपुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीप...
कृषिसेवक भरतीला न्यायाधीकरणाची मनाईपुणे : कृषिसेवक पदासाठी झालेल्या परीक्षेच्या...
लिंबावर काळ्या माशीचा प्रादुर्भावअकोला: लिंबू बागांमध्ये सध्या आंबिया बहर...
विदर्भात आज वादळी पावसाची शक्यतापुणे : वातावरणाच्या खालच्या थरात होत असलेल्या...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
आत्मदहनाचा इशारा देणारे २३ शेतकरी...बुलडाणा: जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या...
‘ग्रीन होम एक्स्पो’ला पुण्यात प्रारंभपुणे : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने सेकंड होम,...
रेपो रेटघटीचा लाभ कोणाला?केंद्रीय अर्थसंकल्प, रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक...
यांत्रिकीकरण ः वास्तव आणि विपर्याससध्या राज्यभर विविध योजनांमधून अवजारे अनुदान...