agriculture news in marathi, weather forecast, Hailstrom, heavy rain alert in state | Agrowon

मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पुणे : अरबी समुद्र व केरळच्या परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र कमी झाले आहे. मराठवाड्यातील परभणी शहर व विदर्भातील नागपूर शहरात हलक्या सरी बरसल्या. उर्वरित भागात हवामान ढगाळ झाले आहे. आज (ता. १३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता. १४) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. त्यामुळे राज्यात पुन्हा किंचित थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

पुणे : अरबी समुद्र व केरळच्या परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र कमी झाले आहे. मराठवाड्यातील परभणी शहर व विदर्भातील नागपूर शहरात हलक्या सरी बरसल्या. उर्वरित भागात हवामान ढगाळ झाले आहे. आज (ता. १३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता. १४) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. त्यामुळे राज्यात पुन्हा किंचित थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

सध्या मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच बांग्लादेशाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. राजस्थान परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. त्याचा परिणाम अजून एक ते दोन दिवस राहील. 

 चार ते पाच दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी रविवारी (ता. ११) गारपीट झाल्याचे चित्र होते. सोमवारी (ता. १२) विदर्भातील नागपूर येथे पावसाच्या अधूनमधून सरी कोसळल्या. उर्वरित भागांत हवामान ढगाळ होते. मराठवाड्यातील परभणी शहराच्या परिसरात हलका पाऊस पडला, तर अनेक ठिकाणी सकाळी ढगाळ हवामान होते. दहानंतर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. मात्र, रविवारी झालेल्या गारपीट व पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढल्याने सोमवारी सकाळी मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी भागांत धुक्यांची चादर पसरली होती. मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात आकाश निरभ्र होते. कोकणातही आकाश निरभ्र होते.  

कोकणात आकाश निरभ्र असल्याने किंचित थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड भागांत किंचित थंडी आहे. औरंगाबाद, बीड, जालना भागांत थंडी कमी झाली आहे. विदर्भात थंडीचा पारा हळूहळू वाढू लागला आहे.  मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ८.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १७.८, अलिबाग १८.६ (१), रत्नागिरी १७.३ (-२), भिरा १६.०, डहाणू १७.६, पुणे १३.३ (२), नगर १०.६ (-३), जळगाव १२.० (-२), कोल्हापूर १८.१ (२), महाबळेश्वर १५.७ (२), मालेगाव १४.५ (३), नाशिक १२.३ (१), निफाड ८.८, सांगली १६.१ (१), सातारा १४.०, सोलापूर १८.२, औरंगाबाद १४.६ (२), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १५.०, परभणी शहर १३.९ (-२), नांदेड १४.० (-१), उस्मानाबाद १३.६, अकोला १७.३(१), अमरावती १५.४ (-१), बुलडाणा १६.४, चंद्रपूर १८.४ (२), गोंदिया १५.०, नागपूर १५.५, वर्धा १७.५ (३), यवतमाळ १९.० (२).

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...