agriculture news in marathi, weather forecast, Heatwave in konkan to last today | Agrowon

शिमग्यालाच कोकण होरपळतेय; उष्णतेची लाट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 मार्च 2018

पुणे  : पूर्वेकडून पश्चिमेकडे काही प्रमाणात वारे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील अनेक भागात उष्णतेची लाट तयार झाली आहे. ही लाट आज (गुरुवारी) कायम राहणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे बुधवारी (ता.२८) कोकणातील भिरा येथील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ५.९ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे कमाल तापमानाची ४२.० अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे  : पूर्वेकडून पश्चिमेकडे काही प्रमाणात वारे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील अनेक भागात उष्णतेची लाट तयार झाली आहे. ही लाट आज (गुरुवारी) कायम राहणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे बुधवारी (ता.२८) कोकणातील भिरा येथील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ५.९ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे कमाल तापमानाची ४२.० अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अरबी समुद्र आणि केरळ ते महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यातच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी असून काही प्रमाणात वारे पूर्वेकडू पश्चिमेकडे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई येथील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअसवर गेले होते. रत्नागिरी येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने वाढले. तर कमाल तापमानाची ३६.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली. उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागातही किंचित वाढ झाली आहे. राज्याच्य उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १३.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या रविवार (ता.४) पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही मंगळवार (ता.६) पर्यत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) २१.० (२), अलिबाग २१.६ (३), रत्नागिरी १९.७ (१), डहाणू २२.४ (४), भिरा १९.० (२), पुणे १४.९ (२), नगर १४.६ (-१), जळगाव १७.४ (२), कोल्हापूर १८.९ (१), महाबळेश्वर १८.६ (३), मालेगाव १८.२ (४), नाशिक १६.२ (३), निफाड १३.०, सांगली १७.१ (१), सातारा १५.८, सोलापूर २०.५ (१), औरंगाबाद १८.६ (४), उस्मानाबाद १६.३, परभणी शहर १८.५ (१), नांदेड १९.० (२), अकोला २०.७ (३), अमरावती २२.० (२), बुलढाणा २०.४ (२), चंद्रपूर २०.० (२), गोंदिया १५.० (-२), नागपूर १६.० (-१), वर्धा १९.४ (२), यवतमाळ २२.० (३) 

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...