agriculture news in marathi, weather forecast, humidity rises in state | Agrowon

वातावरणात दमटपणा वाढला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे : मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि कोकणच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी (ता. ९) ढगाळ हवामान होते. मराठवाडा व विदर्भातही काही भागांत ढगाळ हवामान होते. परिणामी, वातावरणात दमटपणा वाढला असून, कमाल तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि कोकणच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी (ता. ९) ढगाळ हवामान होते. मराठवाडा व विदर्भातही काही भागांत ढगाळ हवामान होते. परिणामी, वातावरणात दमटपणा वाढला असून, कमाल तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण ते लक्षद्वीप या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, तसेच हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मालदीव, कोमोरिनच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. ११) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. शुक्रवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील भिरा येथे ४०.७ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली; तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे १२.९ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली आहे.

ढगाळ हवामानामुळे गुरुवारी (ता. ८) सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, बुलडाण्यातील खामगाव येथे पावसाचा शिडकावा झाला. शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत हवामान ढगाळ होते. त्यामुळे कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

शुक्रवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविलेले कमाल व कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई ३१.० (२२.०), सांताक्रूझ ३०.९ (१९.०), अलिबाग २९.५ (२०.४), रत्नागिरी ३३.९ (२१.१), डहाणू (२०.१), भिरा ४०.७ (१९.०), पुणे ३५.५ (१७.३), नगर ३८.४ (१८.२), जळगाव (१८.०), कोल्हापूर (१९.९), महाबळेश्वर (१८.२), मालेगाव ३७.० (२०.५), नाशिक (१९.२), सांगली (१८.८), सातारा ३५.५ (१७.६), सोलापूर ३८.० (१९.८), औरंगाबाद ३५.१ (२०.४), परभणी (२०.४), नांदेड (२२.५), अकोला ३७.२ (२५.२), अमरावती ३३.८ (२५.०), बुलडाणा ३५.० (२१.६), ब्रह्मपुरी ३५.८ (१२.९), चंद्रपूर ३६.२ (२२.८), गोंदिया (१७.५), नागपूर ३४.१ (२२.६), वाशीम ३७.०,
वर्धा (२१.६), यवतमाळ ३६.५ (२३.४) 

इतर अॅग्रो विशेष
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...