मराठवाडा, कोकण, विदर्भात ढगाळ हवामान
संदीप नवले
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

येत्या सोमवार (ता. 25) पर्यंत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

पुणे ः काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पडत असलेल्या पावसाचा जोर गुरुवारी (ता. 21) कमी झाला. कोकणातील अनेक भागांत ढगाळ हवामान होते. ताम्हिणी, डुंगरवाडी, कोयना, भिरा, वळवण या घाटमाथ्यांवर पावसाच्या हलक्‍या सरी बरसत होत्या. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत हवामान ढगाळ होते. मराठवाडा व विदर्भातही ढगाळ हवामान असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सात ते आठ दिवसांपासून हवेचा दाब कमी झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मागील तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. बुधवारी (ता. 20) दिवसभर राज्यातील अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती.

त्यामुळे गुरुवारी (ता. 21) सकाळपर्यंत रत्नागिरीतील खेर्डी मंडळात सर्वाधिक 182 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून, राज्यातील 86 मंडळांत अतिवृष्टी झाली असल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील भातखाचरांमध्ये पाणी साचून पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले.

सध्या जोरदार पावसामुळे ओढे, नाल्यासह पुण्यातील मुळा-मुठा, नगरमधील मुळा, गोदावरी, नाशिकमधील दारणा दुथडी भरून वाहत असून कोयना, खडकवासला, चासकमान, राधानगरी, गंगापूर, भंडारदरा, निळवंडे, कोयना, उजनी, घोड, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंध्रा, मुळशी अशी काही धरणे भरली असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोकणचा दक्षिण भाग ते कर्नाटक किनारपट्टीवर असलेले द्रोणीय क्षेत्र आता उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. येत्या सोमवार (ता. 25) पर्यंत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

आज (शुक्रवारी) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

कोकणात जोरदार सरी
कोकणात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातील 23 मंडळे, रायगडमधील 13, रत्नागिरीतील 12, पालघरमधील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. उर्वरित भागांत हलक्‍या स्वरूपाच्या सरी बरसल्या असून विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, भांडूप, तुलसी, वैतरणा, अप्पर वैतरणा ही धरणे भरली असून, पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात संततधार
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. जिल्ह्यातील राजूर येथे 75 मिलिमीटर पाऊस पडला. सातारा, सोलापूर, सांगली, नाशिक जिल्ह्यांतील अनेक मंडळांत हलक्‍या स्वरूपाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी हवामान ढगाळ होते. नगर जिल्ह्यातील सतरा मंडळांत अतिवृष्टी झाली असून, अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

त्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत असून मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणे भरली आहेत. त्यातून विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे कोयना, राधानगरी ही धरणे भरली असून, पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टी झाली.

उर्वरित काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. धुळे जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या सरी बरसत होत्या. नंदुरबार जिल्ह्यातील काही मंडळांत जोरदार पाऊस पडला असून, अनेक मंडळांत ढगाळ हवामान होते.

मराठवाड्यात हलका पाऊस
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील सहा मंडळांत अतिवृष्टी झाली असून, उर्वरित भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जालना जिल्ह्यातील तीन मंडळांत अतिवृष्टी झाली. उर्वरित भागांत हलका पाऊस झाला, काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. हिंगोलीतील एक मंडळात अतिवृष्टी झाली असून, उर्वरित भागांत ढगाळ हवामान होते.

बीडमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, अकोला जिल्ह्यांतील काही मंडळांत हलका पाऊस पडला असून, उर्वरित भागांत ढगाळ हवामान होते. नांदेड, लातूर जिल्ह्यांतील काही भागांत ढगाळ हवामान, तर काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते.

विदर्भाला पावसाचा दिलासा
विदर्भातील हिंगोलीतील साखरा, बुलडाण्यातील देऊळगाव, वडनेर, नागपुरातील पारशिवनी, नारखेड येथे अतिवृष्टी झाली. नागपुरातील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. तर वर्धा, गोंदिया, चंद्रपुरातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांतील काही भागांत हलका पाऊस पडला.

अमरावतीत काही मंडळांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडल्याची स्थिती होती. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत असली तरी अनेक ठिकाणी रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला असून, धरणांनीही तळ गाठला आहे.

मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
ठाणे ः ठाणे 103, बाळकुम 133, भाईंदर 149, मुंबई 87.2, दहिसर 96, बेलापूर 84, कल्याण 88, उप्पेर 88, तितवाळा 73, ठाकुर्ली 89, नांदगाव 81,
मुरबाड 87.9, देहरी 70, भिवंडी 122, उप्पेर 107, अनगाव 102, दिघाशी 106, खर्बव 122, किन्हावली 94.4, उल्हासनगर 105, अंबरनाथ 83.4, कुंभारर्ली 81,
बदलापूर 118
रायगड ः अलिबाग 115, किहिम 70, चौल 70, पोयंजे 145.3, नेरळ 70.4, चौक 70, वावोशी 147, उरण 72, कोंडवी 79, बोरळी 94, बोरलीपंचटन 90.3,
म्हसाळा 70.2, खामगाव 86.2,
रत्नागिरी ः चिपळून 180, खेर्डी 182, मार्गतोम्हने 75, रामपूर 85, सावर्डे 144, कळकवने 102, शिरगाव 172, दाभोळ 110, वाकवली 92, वेळवी 84,
तळवली 90, तेर्हे 82,
पालघर ः वाडा 76, कडूस 124,
जळगाव ः धानोरा 94, पाचोरा 96, गळन 70, वरखेडी 91,
नगर ः भिंगार 72, चास 115, पारनेर 109, सुपा 129, वडझिरे 96, पळशी 72, सोनई 85, वडाळा 94, राहुरी 126.4, सात्रळ 105, देवळाळी 78,
टाकळीमियॉं 78, श्रीरामपूर 163, बेलापूर 167, उंदीरगाव 104, लोणी 114, बाभळेश्वर 85,
पुणे ः राजूर 75,
औंरंगाबाद ः उस्मानपुरा 71, भावसिंगपुरा 78, वरुडकाझी 78, सिद्धनाथ 70, महालगाव 110, लाडगाव 92,
जालना ः जालना शहर 72, बदनापूर 80, बावने 126,
हिंगोली ः साखरा 110,
बुलडाणा ः देऊळगाव 90, वडनेर 81
नागपूर ः पारशिवनी 74.4, नारखेड 78.2,

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...