agriculture news in marathi, weather forecast, maharashtra | Agrowon

आज, उद्या पावसाचा अंदाज 
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

पुणे : दक्षिण अंदमानच्या समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील २४ तासांत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. परिणामी पुढील दाेन दिवसांत (बुधवार आणि गुरुवार) काेकण, गाेव्यासह दक्षिण महाराष्‍ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल आहे. मंगळवार (ता. २१)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. 

पुणे : दक्षिण अंदमानच्या समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढील २४ तासांत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. परिणामी पुढील दाेन दिवसांत (बुधवार आणि गुरुवार) काेकण, गाेव्यासह दक्षिण महाराष्‍ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल आहे. मंगळवार (ता. २१)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. 

दरम्यान, हरियाना, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

राज्यात गेल्या २४ तासांत सर्वांत कमी १५.५ अंशसेल्सिअस तापमानाची नाेंद उस्मानाबाद येथे झाली. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. तर काेकण गाेव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण हाेते. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. 

राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंशसेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई २४, अलिबाग २३.६, रत्नागिरी २५.१, पणजी २४.५, डहाणू २३.२, भिरा २४, पुणे २०.१, नगर २०.३, जळगाव १६.४, काेल्हापूर २२.२, महाबळेश्‍वर १७.२, मालेगाव १९, नाशिक १८.८, सांगली २०.६, सातारा २०.४, साेलापूर १९.६, उस्मानाबाद १५.५, आैरंगाबाद २१.२, परभणी १८.४, नांदेड २१.५, अकाेला २२.३, अमरावती २०.२, बुलडाणा २०.८, ब्रह्मपुरी १७.८, चंद्रपूर २१.६, गाेंदिया १७, नागपूर १८, वाशीम १९, वर्धा १९.५, यवतमाळ १८. 

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...