राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे : साेमवार (ता. २) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत काेकण, गाेव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नाेंद काेकणात म्हसाळा येथे झाली. पुढील ४८ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुढील चार दिवसांत शुक्रवारी (ता. ६) काेकण, गाेवा, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

साेमवार (ता. २)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) काेकण-गाेवा म्हसाळा - ११०, वैभववाडी ९०, लांजा ७०, संगमेश्‍वर, देवरुख प्रत्येकी ६०, देवगड ५०, मंडणगड श्रीवर्धन प्रत्येकी ४०, चिपळूण, कणकवली, केपे, सावंतवाडी प्रत्येकी ३०

मध्य महाराष्ट्र - गगनबावडा ४०, गारगाेटी, भुदरगड प्रत्येकी ३०, आजरा, पन्हाळा २०

विदर्भ - आंबगाव, देवरी प्रत्येकी ५०, भामरागड, झारीझामनी ४०, शिंदेवाही ३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com