मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज
गणेश कोरे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबई/पुणे : राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागांत ५ ते १४ ऑक्टोबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या काळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.

अतिवृष्टीमुळे खरिपाचे उत्पादनास नुकसान होऊ शकते. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसू शकतो. शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान टाळावे, यासाठी त्यांनी हा शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. जेथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल, तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.

या काळात विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळण्याच्या दुर्घटनादेखील घडू शकतात, अशा वेळी ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी बांधवांनी स्वतःचा आणि जनावरांच्या विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, विजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. ५ ते १४ ऑक्टोबर या काळात मुंबई आणि कोकणपट्ट्यातदेखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
राज्यात आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. तर पुढील तीन दिवसांत शुक्रवार (ता. ६) व शनिवारी (ता. ७) मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी; तर काेकण गाेवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवार (ता. ३)पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात काेकण, गाेवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी; तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. राज्याच्या विविध भागांत गेल्या २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे ः

काेकण - गाेवा ः कणकवली, लांजा, रत्नागिरी, वैभववाडी प्रत्येकी ५०, संगमेश्‍वर, देवरुख प्रत्येकी ४०, चिपळूण ३०, मालवण, पाेलादपूर, राजापूर प्रत्येकी २०

मध्य महाराष्ट्र - पन्हाळा ६०, राधानगरी ४०, माढा ३०,

मराठवाडा - देगलूर, गंगाखेड, हदगाव, मुदखेड, परभणी, तुळजापूर प्रत्येकी २०

विदर्भ ः गाेंदिया, गाेंड पिंपरी प्रत्येकी १०

इतर ताज्या घडामोडी
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...