विदर्भातील कमाल तापमानात वाढ

आज (शुक्रवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.
विदर्भातील कमाल तापमानात वाढ
विदर्भातील कमाल तापमानात वाढ

पुणे : राज्यातील बहुतांशी भागांत हवेचा दाब 1006 ते 1008 हेप्टापास्कल आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ होत असून, विदर्भातील अनेक भागांत दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे. गुरुवारी (ता. 5) सकाळपर्यंत विदर्भातील अकोला येथे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारनंतर नागपूर, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या राज्यातील काही भागांत कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. येत्या सोमवार (ता. 9)पर्यंत गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. आज (शुक्रवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

गुरुवारी सकाळपर्यंत कोकणातील वाल्पोई येथे 40 मिलिमीटर पाऊस पडला. तर दाभोलीम, पेडणे, कुडाळ, मार्मगोवा येथे हलक्‍या स्वरूपाच्या सरी बरसल्या. तर मध्य महाराष्ट्रात चंदगड येथे 30, आजरा येथे 20 मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातील अहिरी येथे 30 मिलिमीटर पाऊस पडला. तर एटापल्ली, सिंरोचा येथे दहा मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे हवामानात सकाळपासून उकाडा तयार होत असून, कमाल तापमानात वाढ होत आहे. विदर्भापाठोपाठ, पुणे शहराच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे 33.5, जळगाव 36.0, कोल्हापूर 31.0, नाशिक 33.9, सांगली 32.7, सातारा 31.6, सोलापूर 34.0, मुंबई 33.7, सांताक्रूझ 35.8, अलिबाग 32.4, रत्नागिरी 32.0, परभणी 34.9, अकोला 37.6, अमरावती 35.0, चंद्रपूर 35.4, गोंदिया 34.8, नागपूर 35.6, वाशीम 36.2, वर्धा 36.0

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com