तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज

तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज

पुणे : येत्या ४८ तासांत काेकण गाेव्यात तुरळक ठिकाणी जाेरदार, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पुढील २४ तासांत (रविवारी ता. ८) गाेव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नाेंद राेहा येथे झाली.

शनिवार (ता. ७) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्यात काेकण गाेव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर काेकणासह गाेव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे.

शनिवार (ता. ७) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

काेकण गाेवा ः राेहा ११०, सुधागडपाली ७०, हर्णे ६०, चिपळूण, म्हसाळा प्रत्येकी ५०, मानगाव ४०, खालापूर माथेरान मुरूड, पेण, पाेलादपूर, संगमेश्‍वर, देवरूख प्रत्येकी ३० मध्य महाराष्‍ट्र - शिराेळ ६०, हातकणंगले, कराड, पन्हाळा, सातारा प्रत्येकी ५०, भाेर, महाबळेश्‍वर, शिराळा, वेल्हे प्रत्येकी ४०, बारामती, दाैंड, खंडाळा, बावडा, मिरज, पळस, सांगली, शाहूवाडी, तासगांव प्रत्येकी ३० मराठवाडा ः वैजापूर २०,भूम, घनसावंगी, केज, परळी वैजनाथ पूर्णा प्रत्येकी १० विदर्भ - भामरागड २०, अहिरी, चिखलदरा, गडचिराेली प्रत्येकी १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com