agriculture news in marathi, weather, forecast, pune | Agrowon

राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज
संदीप नवले
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

आज (ता. ९) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर संपूर्ण राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : येत्या काही दिवसांत परतीचा पाऊस राज्यात दाखल होण्याची शक्यता असली, तरी सध्या राज्यातील हवामानात कधी ऊन, सावली, ढगाळ हवामान होत अचानक विजांचा कडकडाट व मेघगर्जनेचा पाऊस पडत आहे. रविवारी (ता. ८) अमरावती, अकोला, बुलडाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.

सध्या राज्यातील बहुतांशी भागात हवेचे दाब कमी झाले असून, आर्द्रतेत वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या बुधवार (ता. ११) पर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरवार (ता. १२) पर्यंत कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. पुणे परिसरातही येत्या शनिवारपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहत आहेत, तर सूर्यकिरणे तिरपी पडत आहेत. त्यामुळे दक्षिण भारतात कमाल तापमानात वाढ होत आहे. गेल्या दोन ते चार दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

त्यामुळे विदर्भातील अकोला येथे ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले, तर महाबळेश्वर येथे १७.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. रविवारी (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. त्यामुळे सकाळपासून उकाडा वाढला होता. मराठवाडा व विदर्भात सकाळपासून अनेक भागांत कडक ऊन पडल्यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली होती.

राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे 31.8, जळगाव 35.4, कोल्हापूर 29.8, महाबळेश्वर 25.1,मालेगाव 35.4, नाशिक 32.1, सांगली 30.2, सातारा 28.6, सोलापूर 33.9, मुंबई 32.0, सांताक्रुझ 33.6,
अलिबाग 30.8, रत्नागिरी 31.7, औरंगाबाद 33.4, परभणी 33.8, बीड 34.0, अकोला 35.5, अमरावती 31.6, बुलडाणा 32.5, चंद्रपूर 31.6, गोंदिया 31.8,
नागपूर 33.8, वाशीम 34.0, वर्धा 32.4, यवतमाळ 32.0.

इतर ताज्या घडामोडी
ड्रोनद्वारे निश्‍चित होणार उजनीवरील...सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी...
शेतकरी संघटनेचे आधारस्तंभ रवी देवांग...धुळे : शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे माजी...
बोंड अळी लक्षवेधीवरून विरोधक भडकलेनागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कापूस...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना रस्त्यावर...शेगाव, जि. बुलडाणा : सध्या देशातील सरकारची धोरणे...
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत...नागपूर : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून...
ऋतुमानानुसार अारोग्याची काळजीऋतुनुसार काही आवश्‍यक बदल काही पथ्ये सांभाळावी...
सालीसह फळे खाण्याचे फायदेफळांच्या गरात फायबरचे प्रमाण चांगले असते. ए, बी,...
जंगलाच्या अभ्यासातून शेतीमध्ये सुधारणा...महाराष्ट्रात कोठेही फिरत असता, कोणत्याही...
फुलकिडे, करपा नियंत्रणाकडे लक्ष द्यासध्या रांगडा कांदा व लसूण ही पिके शेतात उभी असून...
कीडनाशक फवारणीचा अाणखी एक बळीअकाेला (प्रतिनिधी) ः कीडनाशकाच्या फवारणीतून...
वऱ्हाडात साडेचार लाख शेतकऱ्यांना...अकोला (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...
सांगलीत कर्जमाफीचे १६५ कोटी वर्गसांगली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
कापूस उत्पादकांना जागतिक व्यापारात...ब्युनॉर्स अायर्स, अर्जेंटिना : येथे सुरू असलेल्या...
हवामान बदलाचे परिणाम केव्हा लक्षात...औरंगाबाद : हवामान बदलाचे ढळढळीत वास्तव व...
नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीसाठी ३७४ कोटीनाशिक : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती...
नाफेडची मूग, उडीद खरेदी अाजपासून बंदअकोला : या हंगामात उत्पादित झालेल्या मूग, उडीद,...
साताऱ्यात कर्जमाफीसाठी २३३ कोटीसातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
भाजीपाला सल्लाडिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढून दुसऱ्या...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल ३३०० ते ४४००...सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक...
पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांबाबत बोलत नाहीत...अहमदाबाद, गुजरात  ः गुजरातमधील विधानसभा...