आक्टोबर हीटचा तडका झाला कमी
संदीप नवले
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यात तापमान वाढले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट होवून आक्टोबर हीटचा तडका सध्या कमी झाला आहे. आज (ता. १०) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तसेच राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यात तापमान वाढले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट होवून आक्टोबर हीटचा तडका सध्या कमी झाला आहे. आज (ता. १०) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तसेच राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

सध्या बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात, बांग्लादेशाच्या परिसर व पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूंपातर आता खोल कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून, ते पश्चिम बंगालच्या परिसरात आहे. त्यामुळे काही प्रमाणात पाऊस कमी होण्याचे संकेत मिळत आहे. येत्या गुरुवार (ता. १२) पर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या शुक्रवार (ता. १३) पर्यंत कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. पुणे परिसरातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. खानदेशातील जळगाव येथे सोमवारी (ता. ९) ३४.६. अंश तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर किमान तापमानातही वाढ झाली आहे.

विदर्भातील नागपूर, अकोला मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यांतील काही ठिकाणी मेघगर्जनेसह रविवारी जोरदार पाऊस पडला. उर्वरित भागांत ऊन; तर काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. कोकणातील बहुतांश भागांत हवामान ढगाळ होते. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश भागांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत होते. रविवारी (ता. ८) सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

कोकणातील भिंवडी, चिपळून, जव्हार, माणागाव येथे मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी, पारनेर, पारोळा, पौंड, मुळशी, शिरपूर, विटा येथेही जोरदार पाऊस पडला. मराठाड्यातील देगलूर, अहमदपूर, ढालेगाव, गंगापूर, वैजापूर, औंरगाबाद येथेही जोरदार स्वरूपाच्या सरी बरसल्या. विदर्भातील अमरावती, बत्कुली, भंडारा, चांदूरबाजार, दिनपूर, तेल्हारा येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी हलका स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी विंजाच्या कडकडाटासह मेघगर्जनेचा पाऊस पडला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

सोमवारी (ता. ९) झालेला पाऊस
परभणी, बाळापूर (जि. अकोला), कोपरगाव (जि. नगर)

राज्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये
कोकण ः भिवंडी ८०, चिपळून, जव्हार, माणगाव ७०, अंबरनाथ ६०, कल्याण, मुखेड, वसई ५०, खेड, मंडणगड, माथेरान, पेण, तलासरी, विक्रमगड ३०,
बेलापूर, कर्जत, पनवेल, पोलादपूर, संगमेश्वर देवरूख, वाडा २०
मध्य महाराष्ट्र ः इगतपुरी ७०, पारनेर, पारोळा, पौंड, मुळशी, शिरपूर, विटा ५०, आंबेगाव, घोडेगाव, चाळीसगाव, धरणगाव, दिंडोरी, फलटण, पुरंदर ४०,
अंमळनेर, चोपडा, देवळा, गिरणा, हरसूल, कळवण, खेड, महाबळेश्वर, मालेगाव, ओझरखेडा, पेठ, त्र्यंबकेश्वर ३०, अकोले, धुळे, एरंडोल, हातकणंगले, जळगाव,
जामखेड, जुन्नर, मंगळवेढा, मिरज, नांदगाव, ओझर, रावेर, सांगोला, शिरूर, वडगाव मावळ, वाई, येवला २०, आजरा, दहीगाव, कोल्हापूर, कोपरगाव, कोरगाव,
निफाड, पंढरपूर, पाटण, पुणे, संगमनेर, सटाणा, सुरगाणा, यावल, वेल्हे १०,
मराठवाडा ः देगलूर ९०, अहमदपूर ७०, ढालेगाव, गंगापूर, वैजापूर ५०, औरंगाबाद, भूम, जळकोट, खुल्ताबाद, लोहारा, सेलू ४०, चाकूर, कन्नड, मानवत,
मुखेड ३०, पाथरी, पाटोदा, वडावणी २०, बिल्लोली, धारूर, हदगाव, कळंब, माजलगाव, फुलंब्री, रेणापूर, सोनपेठ, तुळजापूर, वाशी १०
विदर्भ ः अमरावती ४०, बत्कुली, भंडारा, चांदूरबाजार, दिनपूर, तेल्हारा ३०, देवळी, धरणी, जळगाव जामोद, पोम्भूर्णा, संग्रामपूर २०, आर्वी, चार्मोशी, चांदूर,
देवरी, देसाईगंज, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, गोरेगाव, कळंब, मलकापूर, नांदगावकाजी, नांदुरा, परतवाडा, पौनी, सिंरोचा, वरोरा, वरूड १०.

इतर अॅग्रो विशेष
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...