उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
संदीप नवले
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

आज (बुधवारी) उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

पुणे : सध्या राज्यातील अनेक भागांत हवेचे दाब कमी झाले आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाडा व विदर्भात बहुतांशी ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

येत्या शुक्रवार (ता. 13) पर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. आज (बुधवारी) उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल. शनिवार (ता.14) पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

सध्या राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा 32 अंशापर्यंत खाली आला आहे. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत असून काही भागात उकाडा वाढला आहे. मंगळवारी ( ता. 10) मध्य महाराष्ट्रातील नेवासा, पुणे, मराठवाड्यातील सोयगाव, बनोटी येथे जोरदार पाऊस पडला. कोकणात व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. मंगळवारी सकाळीपर्यंत कोकणातील म्हापसा, म्हसळा, कानकोन, दापोली, मुरबाड अशा काही ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडला. तसेच वाणगाव, भिवपुरी, खंद या घाटमाथ्यावरही हलका पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील पाथर्डी येथे सर्वाधिक 50 मिलिमीटर पाऊस पडला. तर नेवासा, आंबेगाव, घोडेगाव, सुरगाणा, बार्शी येथेही जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यातील घनसांगवी, मुदखेड, वसमत येथे 70 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. उर्वरित अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विदर्भातील मंगळूरपीर येथे 90 मिलिमीटर पाऊस पडला. तर बाभूळगाव, हिंगा, अकोट, अमरावती, बाळापूर, चिखली येथेही जोरदार पाऊस पडला.

मंगळवारी (ता.10) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
कोकण ः म्हापसा 50, म्हसळा 40, कानकोन, दापोली, मुरबाड 30, कर्जत 20, लांजा, महाड, मुंबई, पेरनेम, उरण, वैभववाडी 10
मध्य महाराष्ट्र ः पाथर्डी 60, नेवासा 50, आंबेगाव, घोडेगाव, सुरगाणा 40, बार्शी, दिंडोरी, गगनबावडा, जुन्नर, ओझर, पंढरपूर, फलटण, शेवगाव, सोलापूर 30
चांदवड, जामखेड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर 20, अकोले, धरणगाव, इगतपुरी, कळवण, माढा, महाबळेश्वर, माळशिरस, पेठ, श्रीगोंदा, येवला 10
मराठवाडा ः घनसांगवी, मुदखेड, वसमत 70, अहमदपूर, औढानागनाथ, परभणी 60, औरंगाबाद 50, नायगाव, खैरगाव, उदगीर, उमरी 40, कळंब, खुल्ताबाद, लोहा,
माजलगाव, शिरूरअनंतपाल, सोनपेठ 30
विदर्भ ः मंगळूरपीर 90, बाभूळगाव 80, हिंगा 60, अकोट, अमरावती, बाळापूर, चिखली, करंजालाड, खामगाव, परतूर, तिरोरा 50, धानोरा, लाखंदूर, मोताळा,
मूर्तिजापूर 40, बार्शी, बुलडाणा, चांदूर, दारव्हा, कुही, मलकापूर, पुसद 30, अहिरी, अकोला, अरणी, आष्टी, बत्कुली, भद्रावती, भामरागड, भिवपूर, चांदूरबाजार,
देऊळगाव राजा, कुरखेडा, लाखनी, महागाव, नागपूर, नांदूर, पाटवाडा, राजूरा, साकोली, सिंधखेडराजा, तुमसर, उमरखेड 20

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...