विजांच्या कडकडाटांसह पावसाची आजही शक्यता

येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर कमी होणार असून हळूहळू पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
आजही पावसाची शक्यता
आजही पावसाची शक्यता

पुणे : बंगालचा उपसागर व दक्षिण बांगलादेश येथे निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी (ता. ११) कायम होते. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. आज (गुरुवारी) उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

येत्या शनिवार (ता. १४) पर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवार (ता.१५) पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांशी भागात हवेचे दाब कमी झालेल्या दाबामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर कमी होणार असून हळूहळू पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

तर काही ठिकाणी ढगाळ हवामान असून अधूनमधून ऊन पडत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी झाला असून असून तो 33 अंशपर्यंत खाली आला आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे 33.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद बुधवारी (ता.11) सकाळी झाली. तर महाबळेश्वर येथे 18 अंश सेल्सिअस किमान तापमान होते.

मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमान 25 ते 32 या दरम्यान होते. काही वेळा ढगाळ हवामान होते. तर काही वेळा ऊन पडल्याचे चित्र होते. बुधवारी पुणे परिसरात हलका पाऊस पडला. कोकणात कमाल तापमानाचा पारा 29 ते 32 या दरम्यान होता. डहाणूमध्ये 32.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मराठवाड्यातील कमाल तापमानाचा पारा सात अंशापर्यंत खाली गेला होता. तर कमाल तापमान 25 ते 28 या दरम्यान होते. विदर्भातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमाल तापमान कमी झाले होते. तर कमाल तापमानाचा पारा 28 ते 33 या दरम्यान होता.

राज्यातील शहरनिहाय कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे 28.2, नगर 25.7, जळगाव 30.2, कोल्हापूर 29.7, महाबळेश्वर 22.8, मालेगाव 28.2, नाशिक 29.7, सांगली 30.1, सातारा 30.2, सोलापूर 32.0, सांताक्रुझ 31.4, अलिबाग 29.3, रत्नागिरी 31.8, डहाणू 32.7, उस्मानाबाद 28.9, औरंगाबाद 28.4, परभणी 25.1, अकोला 31.1, अमरावती 29.2 बुलडाणा 28.4, चंद्रपूर 33.2, गोंदिया 32.2, नागपूर 31.4, वर्धा 31.0, यवतमाळ 30.0

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com