agriculture news in marathi, weather, forecast, pune | Agrowon

उस्मानाबाद दहा अंशांवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

पुणे : उत्तरेकडून वारे वाहत असल्याने राज्यातील किमान तापमानाचा पारा हळूहळू घसरू लागला आहे. मराठवाड्यातील उस्मानाबादमधील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून, शनिवारी (ता. 4) सकाळी आठ वाजेपर्यंत येथे सर्वात कमी म्हणजेच दहा अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : उत्तरेकडून वारे वाहत असल्याने राज्यातील किमान तापमानाचा पारा हळूहळू घसरू लागला आहे. मराठवाड्यातील उस्मानाबादमधील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून, शनिवारी (ता. 4) सकाळी आठ वाजेपर्यंत येथे सर्वात कमी म्हणजेच दहा अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. सध्या राज्यातील बहुतांशी भागातील किमान तापमानाचा पारा दोन ते तीन अंश सेल्सिअसने घटला आहे. तर सोलापूर येथील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 6.2 अंश सेल्सिअसने घटला असून 13.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

त्यापाठोपाठ नगर आणि रत्नागिरी येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 4.1 आणि 4.1 अंश सेल्सिअसने घटले आहे. उस्मानाबादपाठोपाठ नाशिकमध्ये पुण्यातील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत 3.3 अंश सेल्सिअसने घटल आहे. तर पुण्यात 12.5 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये 12.6 तर, नगरमध्ये 12.8 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. राज्यातील किमान तापमानाबरोबर कमाल तापमानाचा पाराही एक ते दोन अंश सेल्सिअसने घटला आहे.

सध्या मुंबई, औरंगाबाद, रत्नागिरी अकोला येथील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागात हवामान ढगाळ होते. पुणे परिसरातही गुरुवार (ता.9) पर्यत आकाश अंशत ढगाळ राहील. राज्यात येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून वारे वाहू लागली आहे. दक्षिणेकडील तापमानात वाढ होऊ लागली असल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहे. त्यामुळे थंडी चांगलीच जोर धरू लागली आहे.

शनिवारी (ता. 4) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई 23.8, सांताक्रुझ 21.0, अलिबाग 20.8, रत्नागिरी 18.7, डहाणू 20.2, भिरा 17.0, पुणे 12.5, नगर 12.8, जळगाव 15.2, कोल्हापूर 17.5, महाबळेश्वर 14.6, मालेगाव 15.4, नाशिक 12.6, सांगली 17.1, सातारा 15.0, सोलापूर 13.1, उस्मानाबाद 10.0, औरंगाबाद 14.8, परभणी 14.0, नांदेड, बीड, अकोला 15.7, अमरावती 17.4, बुलढाणा 16.6, ब्रम्हपुरी 15.8, चंद्रपूर 17.2, गोंदिया 15.2, नागपूर 14.6, वाशिम 14.8, वर्धा 15.8, यवतमाळ 15.0
 

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...