agriculture news in marathi, weather, forecast, pune | Agrowon

किमान तापमानात चढ-उतार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यातील बहुतांशी भागांतील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत थंडी कमी- अधिक होत आहे. सोमवारी (ता. 6) सकाळी आठ वाजेपर्यंत नगर येथे 13.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : राज्यातील बहुतांशी भागांतील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत थंडी कमी- अधिक होत आहे. सोमवारी (ता. 6) सकाळी आठ वाजेपर्यंत नगर येथे 13.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

विदर्भाच्या काही भागांत तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मराठवाड्याच्या काही भागांत किंचित घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. नगरमधील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 3.4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कमाल तापमानातही किंचित वाढ झाली आहे.

मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक 3.3 अंश सेल्सिअसने घट होऊन 14.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यापाठोपाठ भिरातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 2.3 अंश सेल्सिअसने घट झाली असून, येथे 23.0 अंश सेल्सिअस तापमान होते. तर नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, अकोला येथील किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली. तर मुंबई, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

सोमवारी (ता. 6) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई 25.2, सांताक्रूझ 23.2, अलिबाग 23.4, रत्नागिरी 24.1, डहाणू 21.9, भिरा 23.0, पुणे 15.9, नगर 13.6, जळगाव 15.4, कोल्हापूर 20.6, महाबळेश्वर 16.4, मालेगाव 15.8, नाशिक 14.0, सांगली 20.2, सातारा 18.0, सोलापूर 17.0, उस्मानाबाद, औरंगाबाद 15.4, परभणी 14.9, नांदेड 17.0, बीड, अकोला 16.2, अमरावती 17.4, बुलडाणा 15.9, ब्रह्मपुरी 15.9, चंद्रपूर 17.6, गोंदिया 15.2, नागपूर 15.0, वाशीम 15.0, वर्धा 15.8, यवतमाळ 14.0

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...