agriculture news in marathi, weather, forecast, pune, maharashtra | Agrowon

पावसाचा आजही अंदाज
संदीप नवले
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

पुणे : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या परिसरात परतीचा पाऊस दाखल आहे. बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे शुक्रवारी (ता. १३) पुणे, अकोला, परभणी शहरात जोरदार पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाळ होते. मध्य महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी ऊन पडले होते. शनिवारी (ता. १४) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पुणे : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या परिसरात परतीचा पाऊस दाखल आहे. बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे शुक्रवारी (ता. १३) पुणे, अकोला, परभणी शहरात जोरदार पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाळ होते. मध्य महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी ऊन पडले होते. शनिवारी (ता. १४) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मध्य पूर्व व लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भापर्यंत असलेली द्रोणीय स्थिती विरून गेली आहे. तरी राज्यात काही भागांत पुढील दहा ते पंधरा दिवस पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरी बरसतील. काही ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जनेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या सोमवार (ता. १६)पर्यंत कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

सध्या राज्यातील बहुतांशी भागातील हवामान कोरडे असून, हवेतील बाष्प कमी होत आहे. त्यामुळे सकाळपासून कडक ऊन पडत आहे. परिणामी हवामानात चांगलाच उकाडा वाढत आहे. राज्यातील जळगाव येथे शुक्रवारी सकाळपर्यंत ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात सरीसरीपर्यंत म्हणजेच २५ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान होते.

कोकणातील कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसदरम्यान होते. मराठवाड्यातील कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, विदर्भातील कमाल तापमान २८ ते ३३ अंश सेल्सिअस या दरम्यान होते. तर उस्मानाबाद येथे१७.२ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते.

राज्यातील शहरनिहाय कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३१.१, नगर ३२.०, जळगाव ३४.४, कोल्हापूर ३१.३, महाबळेश्वर २५.१, मालेगाव ३३.०, नाशिक ३१.४, सांगली ३१.५, सातारा ३०.६, सोलापूर ३३.१,
सांताक्रूझ ३३.३, अलिबाग ३१.८, रत्नागिरी ३२.८, डहाणू ३३.४, उस्मानाबाद ३०.९, औरंगाबाद ३१.०, परभणी ३२.१, अकोला ३३.९, अमरावती २८.२ बुलडाणा ३०.०,
चंद्रपूर ३२.८, गोंदिया ३३.५, नागपूर ३३.२, वर्धा ३३.०, यवतमाळ ३१.०.

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...