agriculture news in marathi, weather, forecast, pune, maharashtra | Agrowon

नागपूर ३६.४ अंशांवर
संदीप नवले
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंत विदर्भातील नागपूर येथे ३६.४ अंश सेल्सिअस एवढी कमाल तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्‍चिम भागात सकाळपासून ऊन व सावलीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे हवामानात सकाळपासून चांगलाच उकाडा तयार झाला होता. परिणामी, कमाल तापमानातही वाढ झाली. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश,
मराठवाडा आणि विदर्भात कडक ऊन पडले होते.

पुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंत विदर्भातील नागपूर येथे ३६.४ अंश सेल्सिअस एवढी कमाल तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्‍चिम भागात सकाळपासून ऊन व सावलीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे हवामानात सकाळपासून चांगलाच उकाडा तयार झाला होता. परिणामी, कमाल तापमानातही वाढ झाली. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश,
मराठवाडा आणि विदर्भात कडक ऊन पडले होते.

काही ठिकाणी अधूनमधून ढगाळ हवामान होते. त्यामुळे या भागातही चांगलाच उकाडा होता. राज्यातील बहुतांशी भागातील कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली; तर किमान तापमानात घट झाली असून, औरंगाबाद येथे १२.४ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते.

परतीचा पाऊस गेल्यामुळे काही भागांत हलका स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान असून, मंगळवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी; तर मराठवाडा व विदर्भात
कडक ऊन पडले होते.

उकाडा वाढणार
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हवामानात उकाडा वाढून पुन्हा कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी व शुक्रवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी बरसण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

इतर ताज्या घडामोडी
सायगावच्या सरपंचांचा प्लॅस्टिकमुक्तीचा...सायगाव : ग्रामपंचायतीचे सरपंच अजित आपटे यांनी...
ऑनलाइन वीजबिल भरणा कोणत्याही शुल्काविनासोलापूर  : ग्राहकांना ऑनलाइनद्वारे आपल्या...
स्थानिक पालेभाज्यांचा आहारात वापर...आफ्रिकेमध्ये पोषकतेसह दुष्काळ सहनशीलतेसारखे अनेक...
सोलापुरात पीककर्ज वाटप अवघ्या १४ टक्‍क्...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी...
सांगोल्यात खरीप वाया जाण्याची भीतीसांगोला : तालुक्‍यात पावसाने दांडी मारल्याने खरीप...
नगरमध्ये ‘जलयुक्त’ची साडेपाच हजारांवर...नगर   ः जलयुक्त शिवार अभियानातून गेल्यावर्षी...
सहा महिन्यांनंतर नीरा नदीत पाणीवालचंदनगर, जि. पुणे : नीरा नदीवरील भोरकरवाडी (ता...
नाशिक विभागात खरिपासाठी ६२ हजार क्विंटल...नाशिक : नाशिक विभागात पाऊस लांबल्याने चिंता वाढली...
पावसाने दडी मारल्यामुळे तीन जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत मृग...
बीडमध्ये दुबार पीककर्ज, संपूर्ण...बीड  : जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा...
‘सेल्फी वुईथ फार्मर’साठी यवतमाळ कृषी...यवतमाळ  : सध्या पेरणी हंगाम सुरू झाला आहे....
परभणी जिल्ह्यात टॅंकरची संख्या घटलीपरभणी : गेल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार...
हमीभावाने विकलेल्या हरभऱ्याचे ३५ कोटी...सोलापूर  : राज्य शासनाने सुरू केलेल्या...
नगर जिल्ह्यात मनरेगाच्या कामांवर ८६४४...नगर : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
केंद्र सरकारने जाहीर केलेले साखर पॅकेज...पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेले साखरेचे...
‘जयभवानी’ने तयार केला स्वत:चा जलमार्गबीड : कुठलाही कारखाना चालविण्यासाठी कच्च्या...
तूर, हरभऱ्याचे साडेअकराशे कोटी मिळेनातसोलापूर : नैसर्गिक आपत्ती, गडगडणारे बाजारभाव,...
राज्य बॅंकेकडून साखर तारण कर्जाचा दुरावाकोल्हापूर : राज्य बँकेने मालतरण कर्जासाठी आवश्‍यक...
केळी उत्पादकांना मिळणार भरपाई :...मुंबई : गेल्या आठवड्यात जळगावमध्ये वादळी...
कोकणात पावसाच्या सरीपुणे : कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी बरसण्यास...