agriculture news in marathi, weather forecast, scattered clouds over konkan and central maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

पुणे : अरबी समुद्र ते दक्षिण महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ आहे. या क्षेत्राची तीव्रता आणखी कमी होऊन आज (ता. २५)पासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उन्हाचा चटका हळहळू वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : अरबी समुद्र ते दक्षिण महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ आहे. या क्षेत्राची तीव्रता आणखी कमी होऊन आज (ता. २५)पासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उन्हाचा चटका हळहळू वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत उल्लेखनीय वाढ झाली. मराठवाड्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर कोकण, गोव्याच्या काही भागांत व मराठवाड्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. शनिवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १३.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली.

जम्मू आणि काश्‍मीर, काबूल ते चीन या भागांत चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. त्याचा परिणाम या भागात होण्याची शक्‍यता असून अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू आणि काश्‍मीर, हिमाचल प्रदेश या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यात असलेले कमी दाबाचे क्षेत्र काही प्रमाणात उत्तरेकडे खेचले गेले आहे. तरी अरबी समुद्र ते दक्षिण महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र अजूनही काही प्रमाणात आहे. मात्र ते फारसे सक्रिय नसल्याने त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्‍यता कमी आहे. पुणे परिसरातही येत्या शुक्रवार (ता. २)पर्यंत हवामान कोरडे राहील.  

शनिवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)  मुंबई (सांताक्रूझ) १९.७ (१), अलिबाग २०.६ (२), रत्नागिरी २१.५ (२), भिरा १९.० (३), डहाणू २०.३ (२), पुणे १६.६ (४), नगर १६.४ (२), जळगाव १६.८ (२), कोल्हापूर १९.५ (३), महाबळेश्वर १७.४ (३), मालेगाव १७.५ (५), नाशिक १५.८ (३), निफाड १३.८, सांगली १८.७ (३), सातारा १७.७ (३), सोलापूर २१.० (३), औरंगाबाद १८.८ (४), उस्मानाबाद १५.५, परभणी शहर १९.० (४), नांदेड १९.० (३), अकोला २२.० (५), अमरावती २०.२ (२), बुलडाणा २१.४ (४), चंद्रपूर २२.० (५), गोंदिया १५.० (-१), नागपूर १७.० (१), वर्धा १८.५ (२), यवतमाळ २१.० (३)

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...