कमी दाबाचे क्षेत्र निर्मितीस प्रारंभ; किनारपट्टीलगत हलके ढग
कमी दाबाचे क्षेत्र निर्मितीस प्रारंभ; किनारपट्टीलगत हलके ढग

कमी दाबाचे क्षेत्र निर्मितीस प्रारंभ; किनारपट्टीलगत हलके ढग

पुणे : अरबी समुद्र, केरळ ते महाराष्ट्राचा परिसर या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हवामान किंचित ढगाळ होते. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली होती. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १५ अंश सेल्सिअची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी कोकणातील अनेक भागांत उष्णतेची लाट होती. त्यामुळे किमान, कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. कमाल तापमानाचा पारा ४२ अंशांपर्यंत पोचला होता. शनिवारी हा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे. किमान तापमान २२ अंशांपर्यंत गेले आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. निफाडपाठोपाठ नगरमध्ये सर्वात किमान तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी नगरमध्ये १५.२ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. पुणे येथे १५.४ अंश सेल्सिअस तापमान होते. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक १९.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. औरंगाबाद येथे सर्वाधिक १८.४ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. परभणी येथे सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसची घट होऊ किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअस एवढे होते. विदर्भात कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. अकोला येथे सर्वाधिक २१.४ अंश सेलिअस किमान तापमान तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर येथे १६.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात विदर्भात किमान, कमाल तापमानात आणखी वाढ होणार आहे. शनिवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) २१.४ (२), अलिबाग २२.० (२), रत्नागिरी २०.७, डहाणू २१.५ (२), भिरा १८.५ (१), पुणे १५.४ (२), नगर १५.२ (-१), जळगाव १८.० (१), कोल्हापूर १९.१ (१), महाबळेश्वर १८.४ (२), मालेगाव १८.६ (४), नाशिक १७.३ (३), निफाड १५.०, सांगली १७.९ (१), सातारा १५.९ (-१), सोलापूर २१.१ (१), औरंगाबाद १८.४ (२), परभणी शहर १६.५ (-२), अकोला २१.४ (३), अमरावती २१.२ (२), बुलढाणा २१.२ (२), चंद्रपूर १६.४ (-३), गोंदिया १७.५, नागपूर १७.६, वर्धा १९.६ (२), यवतमाळ २०.० (१). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com