agriculture news in marathi, weather forecast, sky to be clear today | Agrowon

आकाश निरभ्र होणार; थंडीतही वाढ अपेक्षित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तयार झालेले चक्राकार वारे आणि अरबी समुद्र व केरळच्या परिसरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांची तीव्रता कमी झाली आहे. आजपासून (ता. १४) राज्यात आकाश निरभ्र राहणार असून, थंडीत किंचित वाढ होईल. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ८.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तयार झालेले चक्राकार वारे आणि अरबी समुद्र व केरळच्या परिसरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांची तीव्रता कमी झाली आहे. आजपासून (ता. १४) राज्यात आकाश निरभ्र राहणार असून, थंडीत किंचित वाढ होईल. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ८.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   
मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील नगर, सोलापूरचा काही भाग, मराठवाडा व विदर्भात मंगळवारी (ता. १३) ढगाळ हवामान होते. मराठवाड्यातील बुलडाणा व चिखली तालुक्यांतील काही भागांत गारपीट झाली. तसेच उदगीर येथे तीन मिलिमीटर एवढा हलका पाऊस पडला. तर चंद्रपूरमध्ये तीन, ब्रह्मपुरी दोन, यवतमाळ एक मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला होता. परिणामी किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांपर्यंत वाढ झाली होती.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणात आकाश निरभ्र आहे. त्यामुळे थंडीत किंचित वाढ झाली आहे. मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, भिरा, डहाणू येथील किमान तामपानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन अंंशांनी खाली घसरला आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, नाशिक, नगर, निफाड भागांत आकाश निरभ्र असल्याने किंचित थंडी आहे. पुणे, नगर, जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर भागांत थंडी कमी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे वातावरणात उकाडा वाढला असून, काही भागांत मराठवाड्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानाचा पारा पंधरा अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. विदर्भात अकोला, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे थंडी गायब झाली आहे. अमरावती, यवतमाळ येथील किमान तामपानात किंचित घट झाली आहे. 

मंगळवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १५.८ (-२), अलिबाग १७.२ (-१), रत्नागिरी १८.७ (-१), भिरा १४.० (-२), डहाणू १६.७ (-१), पुणे ११.२, नगर १३.४, जळगाव १५.६ (२), कोल्हापूर १७.९ (२), महाबळेश्वर १३.० (-१), मालेगाव १३.२ (१), नाशिक १०.६ (-१), निफाड ८.४, सांगली १७.६ (३), सातारा १४.१, सोलापूर १९.७ (२), औरंगाबाद १७.० (४), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १६.०, परभणी शहर १५.५ (-१), नांदेड १८.० (३), उस्मानाबाद १३.४, अकोला १९.३(३),  अमरावती १६.० (-१), बुलडाणा १६.७ (१), चंद्रपूर १७.०, गोंदिया १६.२ (१), नागपूर १६.६ (१), वर्धा १६.४ (२), यवतमाळ १६.० (-१)

इतर अॅग्रो विशेष
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...