agriculture news in marathi, weather forecast, slit increase in minimum temperature | Agrowon

आर्द्रता कमी होत आहे, निफाड ८.४ अंश
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

पुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा किंचित वाढला आहे. पुढील आठवड्यापासून किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ८.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा किंचित वाढला आहे. पुढील आठवड्यापासून किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ८.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर व श्रीलंकेचा दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे रूपांतर चक्राकार वाऱ्यामध्ये होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर अंतरावर आहे. लक्षद्वीपच्या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तसेच राजस्थानच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यातील थंडीत काही प्रमाणात चढउतार होत आहे. 

कोकणात थंडी गायब ः
कोकणातील अनेक भागांत थंडीने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. मुंबई, अलिबाग, भिरा, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. रत्नागिरीतील किमान तापमान सरासरीएवढे होते. भिरा येथे १७.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.  

मध्य महाराष्ट्रात थंडीत चढउतार : 
मध्य महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. निफाड आणि जळगाव येथे सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. पुणे, महाबळेश्वर येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा येथे थंडी काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते.

मराठवाड्यात किंचित थंडी ः 
मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड येथे थंडी कायम आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते पाच अंशापर्यंत घसरला आहे. औरंगाबाद, येथे थंडीची तिव्रता कमी झाली आहे. परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या परिसरात ८.६ अंश से्ल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. उस्मानाबाद येथील किमान तापमान सरासरीएवढे होते.   

विदर्भात थंडीची लाट ः 
उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. तसेच विदर्भाच्या काही भागात अजूनही आर्द्रता असल्याने थंडीने चांगलाच मुक्काम ठोकला आहे. अजून चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असून त्यानंतर किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. गोदियामध्ये ८.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वाशीम, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ येथे थंडीने चांगलीच हुडहुडी भरविली आहे. 

मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) १७.८ (१), अलिबाग १८.४ (१), रत्नागिरी १९.७, भिरा १७.० (१), डहाणू १७.७ (१), पुणे ११.९, जळगाव ८.८ (-४), कोल्हापूर १७.५ (२), महाबळेश्वर १४.२, मालेगाव १२.२ (१), नाशिक १०.० (-१), निफाड ८.४, सांगली १६.१ (२), सातारा १५.४ (२), सोलापूर १५.७(-१), औरंगाबाद १३.० (१), बीड १२.२ (-२), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) ८.६, परभणी शहर १०.१ (-५), नांदेड १३.० (-१), उस्मानाबाद १०.९, अकोला १२.४ (-२),  अमरावती १५.२, बुलढाणा १४.२ (-२), चंद्रपूर ११.० (-२), गोंदिया ८.५ (-६), नागपूर ११.१ (-३), वाशीम  १२.०, ब्रह्मपुरी ९.९, वर्धा १३.० (-१), यवतमाळ १३.५ (-३).

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...