agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

राज्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्याच्या काही भागात रविवारी (ता. 19) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : राज्याच्या काही भागात रविवारी (ता. 19) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याच वेळी उत्तरेत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. वातावरणातील या बदलांमुळे जम्मु, काश्‍मिर, पश्‍चिम बंगाल, ओरिसा, पंजाब, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तमिळनाडू, पॉंडिचेरी येथे पावसाची नोंद झाली. बदललेल्या या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला आहे. दहा अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालेला किमान तापमानाचा पारा आता बारा अंश सेल्सिअसपर्यंत वाढला असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. 

राज्यात येत्या दोन दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी आकाश ढगाळ राहणार असून, रविवारी दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्‍यता आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरी इतका राहील. 

पुण्यात किमान तापमानाचा 11.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. सरासरीपेक्षा 3.3 अंश सेल्सिअसने हे तापमान कमी झाले होते. मंगळवारपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान 12.8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. येत्या गुरुवारपर्यंत हे तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले. 
 

इतर अॅग्रो विशेष
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...
विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे !...पंढरपूर, जि. सोलापूर : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर...
खरिपाचा पेरा अद्यापही माघारलेलाचनवी दिल्ली ः देशात गुरुवारपर्यंत (ता. १२) खरिपाची...
पंढरीत विठ्ठलाला दुग्धाभिषेक करुन...अकोला : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर राज्यातही...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात मोठ्या धरणांमध्ये यंदा अधिक साठापुणे : राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोटात सुरू...
शाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना...जल, जमीन, जंगल आणि जननी या चार घटकांमुळे मानव...
शेतीला दिली नवतंत्रज्ञान, पशुपालनाची जोडबुर्ली (ता. पलूस, जि. सांगली) येथील महिला शेतकरी...
सेवा कसली, ही तर चक्क लूटबॅंकांच्या सेवांमध्ये काही त्रुटी असतील तर...
‘परभणी शक्ती’ने मिळेल ज्वारीला बळआपला आहार हा रिजन अन् सिझन स्पेसिफीक असला पाहिजे...