agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

काेकण, दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यात सोमवारी (ता. २०) तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सर्वत्र ढगाळ हवामान दिवसभर कायम राहिल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले होते. हवामान असेच राहिल्यास द्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळबागांसह कापूस आणि रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. 

पुणे : राज्यात सोमवारी (ता. २०) तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सर्वत्र ढगाळ हवामान दिवसभर कायम राहिल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले होते. हवामान असेच राहिल्यास द्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळबागांसह कापूस आणि रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, आखाती देशालगत तयार झालेल्या चक्रावातामुळे पुढील २४ तासांत अंदमान निकाेबार बेटांच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य भागावर तयार झालेला चक्रावाताचा प्रभाव कमी झाला आहे. परिणामी शुक्रवारपासून (ता.२४) गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील ४८ तासांत बुधवारी (ता.२२) काेकण, गाेावा व दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

अंदमान निकाेबारच्या समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण हाेते. साेमवार (ता.२०) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत, तर खानदेशसह मराठवाडा, विदर्भ आणि काेकणात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. राज्यातील सर्वांत कमी १५.८ अंशसेल्सिअस तापमानाची नाेंद नगर येथे झाली.
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. तर काेकण, गाेव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. 

साेमवार (ता.२०) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंशसेल्सिअस मध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई २३.८, अलिबाग २४, रत्नागिरी २४.२, पणजी २३.७, डहाणू २१.५, भिरा २२, पुणे २०, नगर १५.८, जळगाव १७, काेल्हापूर २२, महाबळेश्वर १७, मालेगाव १७.८, नाशिक १७.६, सातारा २०.७, साेलापूर २१.१, उस्मानाबाद १६.४, आैरंबागाबाद २०.८, परभणी २०.४, नांदेड २१, अकाेला २२.२, अमरावती २१.२, बुलडाणा २०, ब्रह्मपुरी १८.३, चंद्रपूर २१.२, गाेंदिया १८.१, नागपूर १९.९, वाशीम १६, वर्धा १९.५, यवतमाळ १७.४ 

सोमवारी पहाटे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, गंगापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने कापूस उत्पादकांचे नुकसान झाले. ऊस तोडीसाठी अालेल्या मजुरांचीही धावपळ झाली. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे हलक्या सरी पडल्या. पुणे शहरातील स्वारगेट, धायरी, कोथरुड, स्टेशन, हिंजवडी, सिंहगड रोड परिसरात हलक्या सरी पडल्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते.

    कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान व काही ठिकाणी हलकासा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.  ढगाळ हवामानामुळे किडींचा प्रादुर्भाव बहुतांशी भाजीपाल्यावर वेगाने होतो. शनिवारी (ता. १९) रात्रीपासून थंडी गायब होऊन ढगांची चादर पसरली. शहर व परिसरात पावसाच्या हलक्‍या सरीही झाल्या. काही ठिकाणी काही तास ऊसतोडी व गुऱ्हाळे बंद ठेवावी लागली. रविवारच्या तुलनेत सोमवारी दुपारपर्यंत वातावरण चांगले होते.

इतर अॅग्रो विशेष
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...