agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

गोंदिया 11.5 अंशांवर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

पुणे : उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा वेग काही प्रमाणात थोडा वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढू लागली असून, अनेक भागांत धुक्‍याची परिस्थिती तयार होत आहे. शुक्रवारी (ता. 15) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे 11.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा वेग काही प्रमाणात थोडा वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढू लागली असून, अनेक भागांत धुक्‍याची परिस्थिती तयार होत आहे. शुक्रवारी (ता. 15) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे 11.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या मध्य महाराष्ट्राती काही भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वातावरण ढगाळ आहे. परिणामी, किमान तापमानात काही प्रमाणात चढउतार सुरू आहे. महाराष्ट्राचा मध्य भागातील आडवा पट्टा भाग वगळता वरील व खालील भागात बाष्प जास्त आहे. त्यामुळे या भागात धुक्‍याचे प्रमाण जास्त जाणवत आहे. तसेच मुंबई तसेच किनारपट्टीवरील भागात बाष्प जास्त असल्यामुळे व हिमालयातील थंड वारे वाहून येत असल्यामुळे किनारपट्टी भागातसुद्धा धुक्‍याचे प्रमाण आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत धुके कमी-जास्त प्रमाणात आहे. उर्वरित महाराष्ट्रात सकाळी उशिरापर्यंत धुके असणार आहे.

येते काही दिवस हवामान पूर्णपणे निरभ्र राहणार असून, पावसाची कुठेही शक्‍यता नाही. परंतु दुपारी उन्हाची तीव्रताही वाढेल. वातावरण पूर्णपणे सामान्य असून, फक्त काही भागांत वाऱ्याचा वेग काही अंशी वाढलेला दिसेल. उत्तर भारतामध्ये पाण्याची वाफ व ढग जमा झाल्यामुळे वातावरण सध्या तिकडे खराब आहे. त्यात थंडी असल्यामुळे उत्तर भारतात दाट धुके व हिमकण पडल्याचे जाणवत आहे. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये थंडी व बऱ्यापैकी धुके असे वातावरण असणार आहे

शुक्रवारी (ता. 15) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) 17.4 (-1), अलिबाग 19.0, रत्नागिरी 19.5 (-1), डहाणू 19.5 (1), भिरा 17.5 (-1), नगर 14.7 (3), पुणे 14.6 (3), जळगाव 14.8 (3), कोल्हापूर 19.0 (3), महाबळेश्वर 15.7 (2), मालेगाव 15.2 (4), नाशिक 13.0 (3), सांगली 17.2 (3), सातारा 14.5 (1), सोलापूर 16.1 (1), औरंगाबाद 16.2 (5), बीड 16.0 (4), परभणी 17.0 (4), नांदेड 18.0 (6), उस्मानाबाद 13.0, अकोला 19.4 (6), अमरावती 16.4 (1), बुलडाणा 18.0 (3), चंद्रपूर 16.8 (4), गोंदिया 11.5 (-1), नागपूर 14.6 (2), वाशीम 15.4, वर्धा 15.5 (2), यवतमाळ 20.0 (5)

इतर अॅग्रो विशेष
आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव...सोलापूर  : आषाढी सोहळ्यातील शासकीय...
लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडतराहुरी, जि. नगर : चिंचविहिरे येथे कृषी विभागाच्या...
तालुका कृषी कार्यालयाचा कारभार हाकतात...गडचिरोली ः दुर्गम, आदिवासीप्रवण भागात कृषी...
देशातील जलाशयांमध्ये ३२ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ९१ जलशयांमध्ये...
विदर्भात अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या...
आज आषाढी एकादशीपंढरपूर :  त्रिविध तापांची झाली बोळवण ।...
शासकीय महापूजेला मुख्यमंत्री जाणार नाहीतपुणे - आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना...
तेल्हारा तालुक्यात बीटीवर बोंड अळीअकोला ः यंदाच्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड...
साखरेसाठी दुहेरी दर योजना अव्यवहार्यनवी दिल्ली ः साखरेचे दर घसरल्याने उद्योगात वापर...
आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद लातूर  : पेरणीचे सूक्ष्म नियोजन व अचूक संकलन...
पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे...
बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाखांचा...परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (...
दूध दराबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारकपुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या...
पुणे दूध संघाला ‘एनडीडीबी’चे मानांकनपुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी...
पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर...भाग गेला, शीण गेला । अवघा झाला आनंद ।। ...
शेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...
बचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...
दूध दरवाढ निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत...कोल्हापूर: दूध संघांनी गायीच्या दुधास २५ रुपये...
विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार...नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०...