agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

नाशिकचा पारा १२.६ अंशांवर
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

पुणे ः मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. कोकण आणि मराठवाड्यातील किमान तापमानात अंशतः वाढ झाली. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या भागातील किमान तापमानाचा पारा सरासरीपर्यंत खाली उतरेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १२.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

पुणे ः मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. कोकण आणि मराठवाड्यातील किमान तापमानात अंशतः वाढ झाली. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या भागातील किमान तापमानाचा पारा सरासरीपर्यंत खाली उतरेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १२.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

महाराष्ट्राच्या काही भागांत कमी दाबाचा पट्टा असल्याने पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढलेला होता. रविवारी सकाळपर्यंत किमान तापमानात २.६ अंश सेल्सिअसची वाढ झाली होती. कमी दाबाच्या प्रभाव पुढील दोन दिवसांमध्ये ओसणार असल्याने सध्या अंशतः ढगाळ असलेले आकाश निरभ्र होईल. त्याचा परिणाम म्हणून थंडीचा कडाका पुन्हा वाढेल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब, राजस्थान येथील काही भागांत थंडीची लाट आली आहे. पुणे शहर शहर आणि परिसरात या आठवड्यात थंडीचा कडाका वाढण्याचे संकेत हवामान खात्याने रविवारी दिले. रविवारी (ता. १७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत१३.५ अंश सेल्सिअस असलेला किमान तापमानाचा पारा पुढील सहा दिवसांमध्ये ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...