agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

ब्रह्मपुरीचा पारा ८.८ अंशांवर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पुणे : उत्तरेकडून येणारे थंड वारे विदर्भाच्या दिशेने वारे वाहत आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक भागात थंडी असून, किमान तापमानाचा पारा आठ अंशांपर्यंत खाली आला आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ८.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : उत्तरेकडून येणारे थंड वारे विदर्भाच्या दिशेने वारे वाहत आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक भागात थंडी असून, किमान तापमानाचा पारा आठ अंशांपर्यंत खाली आला आहे. बुधवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ८.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तरेकडील उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, दिल्ली, हरियाना, चंडीगड, हिमालय, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा या भागांत थंडीची काही प्रमाणात लाट कायम आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. विदर्भातील काही भागांत किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. सध्या गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होत झाली आहे. त्यातच बंगालचा उपसागर ते तमिळनाडूच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. लक्षद्वीपच्या परिसरातही समुद्रसपाटीपासून सुमारे २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांवर झाला आहे. त्यामुळे काही भागांत ढगाळ हवामान असून, या भागातील किमान तापमानात चढउतार सुरू आहे.

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या रविवार (ता. २१) हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही येत्या मंगळवार (ता.२३) पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बुधवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : कुलाबा २२.०, मुंबई (सांताक्रूझ) १९.७ (३), अलिबाग २०.६ (३), रत्नागिरी २१.२ (२), भिरा १७.५ (२), डहाणू १९.८ (३), पुणे १३.८ (३), नगर १३.८ (१), जळगाव १३.६ (२), कोल्हापूर २२.५ (७), महाबळेश्वर १४.४ (१), मालेगाव १५.० (४), नाशिक ११.८ (२), निफाड १०.८, सांगली २१.२ (७), सातारा १६.२ (३), सोलापूर १८.५ (२), औरंगाबाद १५.४ (४), बीड १५.२ (२), परभणी (कृषी विद्यापीठ) १२.०, परभणी शहर १४.५, नांदेड १४.५ (१), उस्मानाबाद १२.४, अकोला १५.५ (१), अमरावती १४.० (-१), बुलडाणा १५.२, ब्रह्मपुरी ८.८, चंद्रपूर ११.४ (-४), गोंदिया ९.४ (-४), नागपूर १०.७ (-३), वर्धा १२.० (-१), यवतमाळ १५.०

इतर अॅग्रो विशेष
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...