agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

किमान तापमानाचा पारा वाढू लागला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे ८.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे ८.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण गोव्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या सोमवार (ता. २२) पर्यंत हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही आकाश निरभ्र राहील.

पहाटे हवेतील आर्द्रता कमी होत असल्याने पहाटेचा गारवा कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे. कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत वाढ झाली आहे. भिरामध्ये १८.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत वाढ झाली आहे. नाशिक, नगर येथील किमान तापमानाचा पारा बारा अंशांपर्यंत होता.

मराठवाड्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते चार अंशांपर्यंत वाढ झाली आहे. उस्मानाबादमध्ये ११.६ अंश सेल्सिअसचे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्याच्या भागात किमान तापमानात घट झाली आहे. सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घट झाली असून, गोंदियात सर्वांत कमी किमान तापमान होते. अकोला, अमरावती, बुलडाणा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंंशांपर्यंत वाढ झाली आहे.

गुरुवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) १९.० (२), अलिबाग २०.६ (३), रत्नागिरी १९.७ (१), भिरा १८.० (३), डहाणू १९.२ (३), पुणे १३.५ (३), नगर १२.८ (१), जळगाव १३.० (१), कोल्हापूर १८.६ (३), महाबळेश्वर १४.६ (१), मालेगाव १५.५ (५), नाशिक १२.६ (३), सांगली १६.१ (२), सातारा १४.७ (१), सोलापूर १६.८ (१), औरंगाबाद १५.२ (४), बीड १३.६ (१), परभणी शहर १४.० (१), नांदेड १४.५ (१), उस्मानाबाद ११.६, अकोला १४.०, अमरावती १६.० (१), बुलडाणा १७.१ (२), चंद्रपूर १२.२ (-३), गोंदिया ८.६ (-५), नागपूर ११.२ (-३), वर्धा १३.० (-१), यवतमाळ १७.०

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
सिंचन योजनांचे अर्थसाह्य महामंडळाच्या...मुंबई : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...