agriculture news in marathi, weather, forecast, temperature | Agrowon

विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जानेवारी 2018

पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ८.९ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ८.९ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण गोव्याच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. येत्या मंगळवार (ता. २३)पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही गुरुवार (ता. २५)पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहील.

दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यादरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. भिरामध्ये १६.१ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत वाढ झाली.

तर नगरमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली असून, सर्वांत कमी म्हणजेच ११.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. मराठवाड्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. परभणीच्या कृषी विद्यापीठात ९.५ अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घटले आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे.

शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)
मुंबई (सांताक्रूझ) १८.२ (१), अलिबाग २०.६ (३), रत्नागिरी १८.६, भिरा १६.५ (१), डहाणू १९.० (२), पुणे १२.३ (१), नगर ११.४ (-१), जळगाव १२.४ (१), कोल्हापूर १७.७ (३), महाबळेश्वर १४.६ (१), मालेगाव १५.५ (४), नाशिक १२.० (२), सांगली १६.२, सातारा १३.५, सोलापूर १६.७ (१), औरंगाबाद १४.० (३), बीड १३.६ (१), परभणी (कृषी विद्यापीठ) ९.५, परभणी शहर ११.८ (-३), नांदेड १३.० (-१), उस्मानाबाद १०.४, अकोला १४.०, अमरावती १४.२ (१), बुलडाणा १६.८ (२), ब्रह्मपुरी ८.९, चंद्रपूर ११.२ (-४), गोंदिया ९.३ (-४), नागपूर ९.८ (-४), वर्धा ११.५ (-२), यवतमाळ १३.४ (-२)

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...