उकाडा वाढला
संदीप नवले
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

राज्यातील कमाल तापमानात सोमवारी (ता. २५) सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली.

पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे सकाळपासून ऊन पडत असून, उकाडा वाढू लागला आहे. नागपुरात सोमवारी (ता.२५) कमाल तापमानाची सरासरी ३५.० अंश सेल्सिअसची नोंद झाली; तर पुणे, वर्धा येथील कमाल तापमानात वाढ झाली असून, आॅक्टोबर हीटची चाहूल लागली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोमवारी (ता.२५) सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भातही दोन ठिकाणी हलका पाऊस पडला. सोमवारी दिवसभर कोकणात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही काही ठिकाणी ढगाळ हवामान होते.

अनेक ठिकाणी सकाळपासून ऊन पडल्याचे चित्र होते. त्यामुळे सकाळपासून उकाड्यात वाढ होण्यास सुरवात झाली. दुपारी हवामानात चांगलाच उकाडा तयार झाला होता. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे चित्र होते. कोल्हापूरमध्ये सकाळी धुके पडले होते.

कोकणातील चिपळूण येथे रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला; तर संगमेश्वर, देवरूख, वैभववाडी, पोलादपूर, दोडामार्ग, कणकवली, पेडणे येथेही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, पन्हाळा येथे ७० मिलिमीटर पाऊस पडला. गगनबावडा, काडगाव, सांगली, शिरोळ, तासगाव येथेही हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. मराठवाड्यातील मुखेड येथे १० मिलिमीटर; तर तर विदर्भातील सेलू, हिंगणघाट, बाभूळगाव येथेही हलका पाऊस पडला.

कोकणात गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता
येत्या गुरुवारी (ता.२८) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता. २६) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी; तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.

सोमवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
कोकण ः चिपळूण ८०, संगमेश्वर देवरूख, वैभववाडी ५०, पोलादपूर ३०, दोडामार्ग, कणकवली, पेडणे, सावंतवाडी १०
मध्य महाराष्ट्र ः कोल्हापूर, पन्हाळा ७०, गगनबावडा, काडगाव, सांगली, शिरोळ, तासगाव ५०, गडहिंग्लज, हातकणंगले, राधानगरी, वाळवा, इस्लामपूर ३०,
कागल, कराड, कवठेमहाकाळ, कोरेगाव, मिरज, शाहूवाडी, शिराळा २०, गारगोट १०
मराठवाडा ः मुखेड १०
विदर्भ ः सेलू ४०, हिंगणघाट २०, बाभूळगाव १०

इतर ताज्या घडामोडी
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...