agriculture news in marathi, weather forecast, temperature increase | Agrowon

उकाडा वाढू लागला
संदीप नवले
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

शुक्रवारी (ता. 29) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

पुणे ः पावसाने उघडीप दिल्याने राज्यात हवेचा दाब वाढू लागला आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत असून उकाड्यात वाढ झाली आहे. विदर्भातील अकोला येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसची वाढ होऊन सरासरी 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

येत्या सोमवार(ता. 2)पर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी (ता. 29) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

सध्या राज्यात अनेक ठिकाणी हवामान कोरडे आहे. गुरुवारी (ता. 28) सकाळपर्यंत कोकणातील हर्णे येथे 30 मिलिमीटर पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे 20, ओझर येथे 10 मिलिमीटर पाऊस पडला. गुरुवारी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात हलका पाऊस पडला. उर्वरित भागात हवामान कोरडे होते.

त्यामुळे हवामानात सकाळपासून उकाडा वाढला होता. पुणे जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली असून मध्य महाराष्ट्रात 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोकणातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या खाली होते. मराठवाड्यातील कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात 31 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...