agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon

तापमान पुन्हा वाढू लागले
संदीप नवले
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेस पाऊस पडला. रविवारी (ता.15) खान्देश आणि विदर्भातील काही भागातून परतल्याने परतीच्या पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. सोमवारी (ता. 16) सकाळपासून उकाडा वाढला होता. परिणामी तापमान पुन्हा वाढायला सुरवात झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेस पाऊस पडला. रविवारी (ता.15) खान्देश आणि विदर्भातील काही भागातून परतल्याने परतीच्या पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. सोमवारी (ता. 16) सकाळपासून उकाडा वाढला होता. परिणामी तापमान पुन्हा वाढायला सुरवात झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या राज्यातील काही काही भागात हवेचे दाब वाढत असल्यामुळे कमाल तापमानात वाढू लागले आहे. सोमवारी (ता. 16) सकाळपर्यंत विदर्भातील अकोला येथे 35.7 अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान होते. कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्‍चिम भागात सकाळपासून ऊन व सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे हवामानात सकाळपासून चांगलाच उकाडा तयार झाला होता. परिणामी कमाल तापमानातही वाढ झाली. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भात कडक ऊन पडले होते. काही ठिकाणी अधूनमधून ढगाळ हवामान होत होते. त्यामुळे या भागातही चांगलाच उकाडा तयार झाला होता. त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली.

परतीचा पाऊस माघारी गेल्यामुळे काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सोमवारी (ता.16) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाच्या सरी बरसल्या. मध्य महाष्ट्रातील कवठेमहाकाळ येथे सर्वाधिक 120 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून शिरोळ, जाट, खंडाळा, बावडा या भागात अतिवृष्टी झाली. कोकणातील रोहा, कणकवली, पेण, वेंगुर्ला, विक्रमगड येथेही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातील सोनपेठ, लोहारा, बिलोली, विदर्भातील सिंरोचा येथे हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या.

हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता
परतीच्या पावसाने रविवारी (ता.16) माघार घेतल्याने आज (मंगळवारी) आणि उद्या (बुधवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हवामानात उकाडा वाढून पुन्हा ऑक्‍टोबर हीट वाढण्याचा अंदाज आहे. गुरुवारी व शुक्रवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी बरसण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरातही आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

सोमवारी (ता.16) सकाळी आठवाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
कोकण ः रोहा 50, कणकवली, पेण, वेंगुर्ला, विक्रमगड 30, लांजा, संगमेश्वरदेवरुख 20, दापोली, देगवड, जव्हार, कुडाळ, मालवण, मंडणगड, मोखाडा, मुंबई, मुरबाड, राजपूर, सावंतवाडी, सुधागडपाली, वैभववाडी, वाडा 10
मध्य महाराष्ट्र ः कवठे महाकाळ 120, शइरोळ 70, जाट, खंडाळा, बावडा 60, महाबळेश्वर, दहीवडी, गगनबावडा, मुळशी, फलटन, सोलापूर, विटा 40, मोहोळ, शिरूर, इस्लामपूर 30, आटपाडी, कागल, खटाव, वडूज, माळशिरस, सांगली, श्रीगोंदा, सुरगाणा 20, केडगाव, कोल्हापूर, कोरेगाव, माढा, ओझरखेडा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, तासगाव, वडगावमावळ, वेल्हा 10
मराठवाडा ः सोनपेठ 30, लोहारा 20, बिलोली, माजलगाव, मुदखेडा, पूर्णा, तुळजापूर, उमरगा 10
विदर्भ ः सिंरोजा 10

सोमवारी (ता.16) राज्यातील शहरनिहाय कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे 31.3, जळगाव 35.6, कोल्हापूर 31.1, मालेगाव 32.5, नाशिक 32.1, सांगली 31.2, सातारा 30.1, मुंबई 31.5, सांताक्रूझ 32.2, रत्नागिरी 31.5, डहाणू 32.5, औरंगाबाद 32.4, परभणी 33.5, अकोला 35.7, अमरावती 32.2, बुलडाणा 32.0, चंद्रपूर 35.0, गोंदिया 34.2, नागपूर 34.8, वर्धा 35.0, यवतमाळ 34.0

इतर ताज्या घडामोडी
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...
बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ गावे... बुलडाणा : जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात...
टीस विद्यापीठ-एसआयआयएलसी शैक्षणिक करारपुणे : शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित टाटा...
मोहरीवर्गीय आच्छादन पिके तण...तणनाशकांना प्रतिकारकता विकसित झालेली असल्याने...
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळापुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना...
औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस...औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा...
नाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी...नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील...
मराठवाड्यात शेततळ्यांचे पूर्णत्‍व...औरंगाबाद : मराठवाड्यात उद्दीष्टाच्या तुलनेत...
सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला...मुंबई : सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि...
सुपीकता टिकवण्यासाठी संवर्धित शेतीपारंपरिक शेतीपासून किमान मशागत ते शून्य मशागत हा...
पुणे जिल्ह्यात टोमॅटो लागवडीस प्रारंभ पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी...
साताऱ्यात मेथी ५०० ते ७०० रुपये शेकडा सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...