agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon

राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढला
संदीप नवले
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी भागांत कोरडे हवामान आहे. त्यामुळे हवेतील बाष्प कमी होत आहे. बुधवारी सकाळपासून कडक ऊन पडत असून राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढला असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी भागांत कोरडे हवामान आहे. त्यामुळे हवेतील बाष्प कमी होत आहे. बुधवारी सकाळपासून कडक ऊन पडत असून राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढला असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या राज्यातील काही भागांत आर्द्रता कमी-अधिक होत आहे. येत्या रविवार(ता. २२)पर्यंत राज्यातील काही भागांत हलका पाऊस पडेल. आज (ता. १९) राज्यात हवामान कोरडे राहील. उद्या (ता. २०) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात हवामान कोरडे राहील, तर कोकणात हलका पाऊस पडेल. पुणे परिसरातही काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याच शक्यता असून येत्या मंगळवार(ता. २४ पर्यंत हवामान अंशत ढगाळ राहील.

सध्या राज्यातील उष्णतेत वाढ होत आहे. त्यामुळे सकाळपासून राज्यातील बहुतांशी भागांत हवामान कोरडे राहत असून बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंत कोकणातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी हवामान कोरडे होते. बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंत नागपूर येथे ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर किमान तापमानातही एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पुण्यात १८.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...
राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा...नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी...
कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले...नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज,...
`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती,...बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक...
कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी...राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक...
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणारपुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...